पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पाणी चोरीच्या घटनात वाढ

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पाणी चोरीच्या घटनात वाढ

 पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पाणी चोरीच्या घटनात वाढ

      भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे यांचा आरोप..  

डोंबिवली शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात  पाणी गळती होत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचे काम केले जाते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पाणी गळती सुरू होते. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे संकट असताना पालिकेच्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी वाया जाते. तर पाणी मीटर मध्येही फेरफार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पालिकेतर्फे जोडणी दिलेल्या जलवाहिन्यांची निगा राखली जात नाही इतकेच नव्हे तर अनधिकृतरीत्या मीटर बसवून पाणी चोरी देखील केली जाते.त्यामुळे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पाणी चोरीच्या घटना वाढत आहे असा आरोप   भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी केला आहे.पाणी चोरीबाबत राणे यांनी  अनेक वेळा तक्रारी करून देखील दुर्लक्ष होत असल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.  

 

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पाणी चोरीच्या घटनात वाढ होत  असल्याचा आरोप भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी केला आहे. दरवर्षी मार्च ते जून या काळात कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पालिकेतर्फे जोडणी दिलेल्या जलवाहिन्यांची निगा राखली जात नाही इतकेच नव्हे तर अनधिकृतरीत्या मीटर बसवून पाणी चोरी देखील केली जात आहे. अनेक ठिकाणी गाड्या धुण्यासाठी देखील अशा पद्धतीने पाण्याचा गैरवापर केला जातो. या गाड्या धुताना वारेमाप पाणी वापरून पाण्याचा नाश केला जातो.यासाठी कोणतीही परवानगी देखील घेतली जात नाही. त्यामुळे पालिकेने याकडे त्वरित लक्ष घालावे असे वारंवार सांगितले  जात असताना देखील पालिकेचे या गोष्टीकडे  सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे २७ गावामध्ये देखील पाण्याची टंचाई असल्याची ओरड सुरू असते ही गावे पुन्हा पालिकेत आली आहेत. त्यामुळे या गावात पाणी पुरेसे मिळत नसताना देखील हजारो लिटर पाणी वाया जाते याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली. 

0 Comments: