डोंबिवलीजवळील संदप गावातील नवीन पाण्याच्या टाकी बसवली जाणार...
डोंबिवली ( शंकर जाधव ) माजी आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यकाळात आमदार निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील संदप गावात पाण्याची टाकी ते माणिक पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्यांचे नुतनीकरण अशा दोन विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कल्याण ग्रामीण मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मूलभूत सोई सुविधांचा विकास अंतर्गत ५ कोटी इतका विकास निधी मंजूर झाला आहे. जनतेच्या हितासाठी व विकास कामांसाठी सदैव कटीबद्द असल्याचे यावेळी माजी आमदार भोईर यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे , नगरसेविका रविना अमर माळी, उपतालुका संघटक रवि म्हात्रे , युवासेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी,शिवसेना ग्राहक कक्ष जिल्हा अध्यक्ष तृप्ती संतोष पाटील, विभागप्रमुख आकाश देसले व केशव पाटील, शाखाप्रमुख संतोष पाटील, वासुदेव पाटील, श्याम काठे, जीवन ठाकूर,युवासेनेचे मुकेश भोईर नागरिक उपस्थित होते.




0 Comments: