कुंपनच शेत खातं, केडीएमसीच्या कचरा गाडीतील डिझेल चोरताना अधिकाऱ्यांनी केली पोलिसात तक्रार, पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या...
डोंबिवली (ठाणे) (प्रतिनिधी : प्रविण बेटकर)
कचरावाहक घंटागाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका नागरिकाने डिझेल चोरी करतानाचा व्हिडिओ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या कृत्यात घंटागाडी चालक दत्ताराव शिरामे याच्यासोबत अजून किती लोक सामील आहेत, याचा तपास सुरू आहे
काही दिवसांपूर्वी केडीएमसीच्या एका अधिकाऱ्याला एका नागरिकाने एक मोबाईल क्लीप दिली होती. या क्लीमध्ये एक व्यक्ती कचरा वाहक घंटा गाडीमधून डिजेल काढतानाचे दिसून येत होते. केडीएमसी प्रशासनाकडून याची चौकशी सुरु झाली. सदर व्हीडीओ हा आय प्रभागामधील गोलवली परिसराचा होता. डिझेल काढणारा दुसरा कोणी नाही तर घंटागाडीवरील चालक दत्ताराव शिरामे होता. घंटागाडीसाठी लागणारे इंधन केडीएमसीकडून पुरविले जाते. मात्र चालक हे कंत्राटदाराकडून नियुक्त केले जातात. दत्ताराम शिरामे हा विशाल एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घंटागाडीवर ठेवण्यात आला होता. डिझेल चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी केडीएमसी अधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी डिझेल चोरणाऱ्या दत्ताराम शिरामे याला अटक केली आहे. एका जागरुक नागरिकाच्या मोबाईल क्लिपमुळे उघडकीस आल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. दत्ताराव याने अनेकदा असा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखीन किती लोक या प्रकरणात सामील आहे याचा तपास पोलीस करत आहेत.




0 Comments: