कल्याणात ट्रॅफिक सिग्नल मोडल्यास होणार कारवाई

कल्याणात ट्रॅफिक सिग्नल मोडल्यास होणार कारवाई

 कल्याणात ट्रॅफिक सिग्नल मोडल्यास होणार कारवाई 

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकेडीएमसी यांच्या स्मार्ट आणि सेफ सिटी एलिमेंन्ट या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी पासुन  आधारवाडी जंक्शन, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल जंक्शनप्रेम ऑटो, चक्की नाकासुभाष चौक,विठ्ठलवाडी तलाव, काटेमानेवली,जंक्शन या आठ वर्दळीच्यारहदारीच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे सिग्नल यंत्रणा बसविल्यानंत या ठिकाणी एखादया वाहनाने सिग्नल तोडल्यास सिग्नल यंत्रणेतील स्वयंचलित कॅमे-याने सदर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जाऊन ज्या व्यकतीच्या नावावर सदर वाहन रजिस्टर असेल त्याला ई- चलनाचा म्हणजेच दंडाचा संदेश दिला जाईल. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या सर्व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होईल.दरम्यान डोंबोवली शहरतील वाढत्या वाहनाची संख्या पाहता प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे या कामातही डोंबिवली शहराला सापत्य वागणूक दिली. डोंबिवली शहरात एकही सिग्नल लावले नाहीत.याबाबत डोंबिवलीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.   

 

0 Comments: