संतप्त उपोषण कर्तानी आज पुन्हा अरुणा प्रकल्पाच्या पीचींगचे आणि कालव्याचे काम बंद पाडले.
-----------------------------
6 फेब्रुवारी 2021
अरुणा प्रकल्प स्थळावरुन
जो पर्यन्त बंद केलेला पाण्याचा विसर्ग सुरु करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या बुडालेल्या घरांचा पंचनामा होत नाही तो पर्यन्त धरणाचे कोणतेही काम चालु रहाणार नाही. या व इतर मागण्या लेखी स्वरुपात घेतल्या नंतर काल अरुणा प्रकल्पगृस्तांनी आपले लक्षवेधी आमरण उपोषन मागे घेतले होते. दरम्यान आज ६ फेब्रुवारी २०२१ रोजी जलसंपदा विभागाने सुरु ठेवलेले धरणाच्या पिचींग चे आणि कालव्याचे काम संतप्त प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले आहे.
जो पर्यन्त अरुणा प्रकल्पात बुडालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा पंचनामा होत नाही. तो पर्यन्त प्रकल्पस्थळी कोणत्याही स्वरुपाचे काम होणार नाही. असे काल उपोषणस्थळी प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना बजावले होते. तरीही निढाँवलेल्या ठेकेदार आणि जलसंपदा विभागाने आज दुसर्याच दिवशी प्रकल्पाची विविध कामे चालु ठेवली होती. याची माहीती मीळताच अरुणा प्रकल्पग्रस्तांचे नेर्तुत्व करणाऱ्या लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे,मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत,संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,खजिनदार विलास कदम,उपाध्याक्ष पांडुरंग जाधव,उपाध्यक्ष मुकेश कदम,श्रिकांत बांद्रे आदि नी प्रकल्पस्थळी धाव घेतली.
प्रकल्प स्थळी उपस्थित असलेले उपविभागीय अभियंता श्रि तळेकर व इंजिनीअर बोंद्रे यांना जाब विचारला.धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांचा पंचनामा न करता काम का सुरु ठेवले अशी विचारणा करुन संतप्त प्रकल्पग्रस्तांनी यावेळी चालु असलेले पिचींगचे काम व कलव्याची कामे बंद पाडली.
प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग सुरु करुन बुडालेल्या घरांचा पंचनामा होत नाही तो पर्यन्त प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत कोणतेही काम सुरु करायचे नाही असा इशारा प्रकल्प ग्रस्तांच्या प्रतिनिधीनी दिला आहे.




0 Comments: