दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा जास्त वाढल्याने नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु असताना डोंबिवलीत दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली.गेल्या २४ तासात दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश्री शिंदे यांनी डोंबिवलीतील विविध चौकात उद्घोषना करून रिक्षातून फक्त दोन प्रवासी वाहतूकीस परवानगी असून नियमाचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांन दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच रिक्षाचालकांनी आणि प्रवाश्यांनी तोंडावर मास्क लावावे असे आवाहन केले.त्यानंतरही रिक्षाचालक नियमांचे पालन करत नसल्याने वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६० रिक्षाचालकांना प्रत्येकी ५०० रुपये असा दंड भरावा लागला.डोंबिवलीत सुमारे २५ हजार पेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावतात.यातील फक्त ४० टक्केच रिक्षाचालक सरकारी नियमांचे पालन करताना दिसतात.तोंडावर मास्क न घालणे,सोशल डीस्टेन्सिंग अश्या नियमांचे पालन करत नव्हते. तर काही रिक्षाचालकांनी फक्त दिखावा करत मास्क चेहऱ्यावर लटकवले होते.याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक शिंदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या,रिक्षाचालकांना आवाहन करूनही ते नियमाचे पालन करत नाहीत.सर्वच रिक्षाचालक असे करतात असे मी नाही म्हणणार. पण जे रिक्षाचालक नियमांचे पालन रत नाही त्याच्यांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.





0 Comments: