अगर शिवाजी ना होते

अगर शिवाजी ना होते

 अगर शिवाजी ना होते




सर यदुनाथ सरकार म्हणतात, आग्र्याहून सुटका हा भारत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे.


शिवरायांना काबुल किंवा कंदाहारला कायमचे पाठवून दयायचे , असे औरंगजेबच्या मनात होते. शिवराय त्याला पुरून उरले. ही खन्त औरंगजेबच्या मनात मरेपर्यंत राहिली. मुघल साम्राज्य खालसा व्ह्यायला शिवराय कारणीभूत झाले.


**

स्वाभिमान विसरून गेलेल्या महाराष्ट्रात त्यांनी प्राण फुंकला. आदिलशाहीची आरामातली चाकरी करणे त्यांना सहज शक्य होते. पण त्यांनी स्वराज्य निर्माण करायचा ध्यास घेतला. जीवाला जीव देणारी माणसे निर्माण केली.


स्वराज्यासाठी महाराजांनी खूप जोखिमा उचलल्या, प्राण पणाला लावले, अपमान सहन केले, मोठे पराजय सहन केले.


मृत्यूनंतर त्यांच्या पोटच्या मुलाला शत्रूने हालहाल करून मारले. सून आणि नातू खूप वर्षे कैदेत राहिले. किती दुःख आले बघा त्या माणसाच्या आयुष्यात. आपण थोडे काय झाले की रडत बसतो.


**

अफझलखान हा मूळचा अफगाणी शूरवीर.  त्याने महाराजांविरुद्ध लढायला येताना आपल्या साठ बायकांना मारून टाकले असे म्हणतात. त्याला महाराजांनी नोव्हेंबर 1659 मध्ये मारले. त्यावेळी सय्यद बंडाने केलेल्या हल्ल्यापासून जीवा महालाने शिवरायांना वाचवले. म्हणून म्हणतात, " होता जीवा म्हणून वाचला शिवा".


पन्हाळा येथील वेढ्यात शिवा काशीदने बलिदान दिले. पावनखिंडीत रात्री बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांनी 300 मावळ्यांसोबत पोशिंद्यासाठी जीवाची आहुती दिली. या लढ्यावर श्री अरविंदनी स्फूर्तिपूर्ण कविता लिहिली आहे.


शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे धाडसाचा कळस होता. त्यात शाहिस्तेखानाची बोटे कापली गेली. त्याला औरंगजेबाने बंगालला हाकलले.


पुत्राचे लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे कोंढाणा घ्यायला गेले. तानाजींचा लढाईच्या सुरुवातीलाच मृत्यू झाला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी आणि त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत पोहोचले. भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दु:ख झाले. पण ती वेळ दु:ख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, "अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही इथे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारा नाहीतर  शत्रूवर तुटून पडा."


फिरंगोजी नरसळ्याने फक्त 300 शिपाई असताना चाकण किल्ला दोन महिने लढवला. समोर शाईस्तेखानचे 20000 शिपाई होते.


मुरारबाजीने पुरंदर खूप शौर्याने लढवला.


महाराजांच्या एका शब्दाखातर नेसरीला प्रतापराव गुजर जोशात येऊन हुतात्मा झाले.


महाराज कल्याणकारी राजे होते. ते पुरोगामी होते. त्यांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोकपण होते. नेताजी पालकरना परत हिंदू धर्मात घेतले.


त्यांनी मोठे आरमार उभारले.



माझ्या आयुष्यात शिवाजी महाराजाना सर्वोच्च स्थान आहे.



महाकवी भूषण


इंद्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,

रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।


पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,

ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥


दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,

'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।


तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,

त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥


भावार्थ - जिस प्रकार जंभासुर पर इंद्र, समुद्र पर बड़वानल, रावण के दंभ पर रघुकुल राज, बादलों पर पवन, रति के पति अर्थात कामदेव पर शंभु अर्थात भगवान शिव, सहस्त्रबाहु पर  परशुराम, पेड़ों के तनों पर दावानल, हिरणों के झुंड पर चीता, हाथी पर शेर, अंधेरे पर प्रकाश की एक किरण, कंस पर कृष्ण भारी हैं उसी प्रकार म्लेच्छ वंश पर शिवाजी शेर के समान हैं।



डॉ सतीश सदाशिव पवार

कणकवली

19 फेब 2021

0 Comments: