अंध व्यक्तीच्या आधारासाठी एक जगा वेगळा व्हॅलेंन्टाईन डे साजरा
जग ज्या वेळेला प्रेमाचा उत्सव साजरा करीत होते त्याच वेळी ज्यांना ज्यांना खरी प्रेमाची गरज आहे, अशा अंध व्यक्तींना एक आगळा वेगळा आधार देण्यासाठी डोंबिवली पश्चिम रेतीभवन बिल्डिंगच्या आधार इंडियाच्या हॉलमध्ये आधार इंडिया या संघटनेच्या सहकार्याने व ब्लाईन्ड प्रोग्रेसिव्ह फौंडेशन चा वतीने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता मोफत कार्यशाळा व अंध व्यक्तींचे आधार केंद्र कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले .
या मोफत कार्यशाळेचे व अंध व्यक्तींच्या या आधार केंद्राचे उद्घाटन लोकसत्यवाणी न्युज चॅनेल व साप्ताहिक स्नेहसंयोग चे संपादक, पत्रकार, लेखक,कवी संतोष गोपाळ सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संपादक संतोष सावंत व प्रमुख पाहुणे म्हणून आधार इंडिया कामगार संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष राजेश कदम, ऐश्वर्या पुणेकर होते तर या कार्यक्रमाचे आयोजक अनिल दिवटे, डॉ अमित दुखंडे, नम्रता पाटकर मॅडम, बुद्धीबळ प्रशिक्षक रवी जाधव, व हार्मोनियम वादक चंद्रकांत गायकवाड, प्रफूल्ल साळी, सुरेश वाघ व त्यांची अंध मुलगी शुभांगी वाघ हि व इतरअनेक अंध स्त्री पुरुष उपस्थित होते. कु. शुभांगी वाघ हिने आपल्याला वयाच्या ५ व्या वर्षानन्तर अंधत्व आले असे सांगितले. तरीही तिने आपले पदवीपर्यतचे शिक्षण मोठ्या जिद्धीने पूर्ण केले,असे लोकसत्यवाणी वृत्त्त वाहिनीशी मुलाखत देताना ती म्हणाली.








0 Comments: