डोंबिवलीत वाढताय मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांची संख्या...
भाजपाच्या आरोग्य शिबीरातून माहिती आली समोर
डोंबिवली ( शंकर जाधव ) खेडेगावाचे शहर झालेल्या डोंबिवली शहर हे धावपळीच्या स्पर्धेत आहे. येथील नागरिकांची जीवनशैली बदलली आहे. याचा परिमाण आरोग्यावर झाल्याने मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे अशी धक्कादायक माहिती डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या आरोग्य शिबिरात समोर आली.भारतीय जनता पार्टी निळजे लोढा पलावा शहर, आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन, तेरणा स्पेशालिटी हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटर, महावीर रुग्णालय डोंबिवली व गायत्री पॅथॉलॉजी लॅब उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीणचे सरचिटणीस रविंद्र पाटील, आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टी निळजे लोढा पलावा शहर अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने सदर शिबीर पार पडले.
या शिबीराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पाचशेहून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीरात बी.पी. शुगर तपासणी, ई.सी.जी. तपासणी,हाडांतील कॅल्शियम तपासणी, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, अल्पदरात चष्मा वाटप, डॉक्टरांकडून सल्ला आणि मोफत ठराविक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. सामान्य रूग्णतपासणी विभाग ही याठिकाणी ठेवण्यात आला होता. या शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, उल्हासनगर बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, महेंद्र पाटील, वसंत पाटील, ब्रह्मा माळी, मोहन पाटील, साजन म्हात्रे, सतीश सिंग, चंद्रकांत शिंदे, अजित सिंग, जयेंद्र पाटील, सदाशिव मालप्पा, करूणा पाटील, आशा बोराडे, मंजू जैन, प्रदीप बोनल, विवेक चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात डॉ. अधिक लोखंडे आणि डॉ. अजित निळे म्हणाले, डोंबिवलीकरांची जीवनशैली बदलली आहे.भारतीय पद्धतीचे जेवण न जेवता फास्टफूडची चव,नियमित व्यायामाकडे लक्ष न देणे, वेळोवेळी तपासणी न करणे या कारणामुळे मधुमेह, हृदयरोग आणि त्वचारोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.नागरिकांमध्ये वयाच्या चाळीस वर्षानंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होते. कॅल्शियम हा हाडांच्या आरोग्यांची देखभाल करण्यास मदत करते. ते स्नायूचे कार्य सुधारते, हदयाचे ताल मजबूत करते, रक्तप्रवाहात इतर खनिजांचा स्तर राखण्याचे काम करतात. कॅल्शियम वाढीसाठी नागरिकांना नैसर्गिकरीत्या डेअरी उत्पादन, अन्नधान्य, ब्रोकोलीचे सेवन करावे असे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी रविंद्र पाटील म्हणाले, या विभागातील लोकांना आरोग्याविषयक जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातत्याने आरोग्यविषयक शिबीराचे आयोजन क रीत असतो. या विभागातील लोक तंदुरूस्त राहावी यासाठी मी माङया परीने प्रयत्न करीत असतो. या मोफत शिबीराच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो, असे सांगितले. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले, या शिबारीत ज्या रूग्णांना मोठय़ा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांना रविंद्र पाटील यांच्या कार्यालयाजवळ गाडीची व्यवस्था केली आहे. या रूग्णांना रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आरोग्य शिबीरात ८० ते ९० टक्के लोकांमध्ये हाडांमधील कॅल्शियमची कमतरता असल्याचे आढळून आले आहे.





0 Comments: