लोकसत्यवाणी न्युज : प्रविण बेटकर
मोबा.-९५९४४०१९२२
वरळी (मुंबई)
मुंबईमधील वरळी येथे दि.७ फेब्रु.२०२१ रोजी माता रमाई स्मृती स्मारकात माता रमाईची जयंती भव्य दिव्य उत्साहात साजरी करण्यात आली. वरळीचे माता रमाई स्मृती प्रतिष्ठान (रजि.) संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मान.अमोल साळुंखे, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील सावली त्यागमूर्ती मातोश्री रमाईच्या दर्शनासाठी आलेल्या तमाम बंधू-भगिनींनी या रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला. पी.जी ग्रुपचे अध्यक्ष मान. प्रकाशभाई गायकवाड, समाजसेवक- प्रदीप एम. शिंदे, पत्रकार प्रविण बेटकर व संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी/कार्यकर्ते तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आदी संपूर्ण मुंबई मधून वेगवेगळ्या ठिकाणाहून धम्मबंधू एकत्र येऊन मातोश्रींच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. "पूर्ण जगाची आई तूच आहेस, आई तु नसतीस तर कदाचित बाबासाहेबांना सुद्धा कमी भासली असती आणि आई तूझी साथ होती म्हणून बाबासाहेब सुद्धा जगासाठी एवढ करू शकले असं काही श्रोत्यांनी आपल्या भाषणात उदगार काढताच जमलेल्या अनुयायांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अशा या लाखोंच्या माऊलीला अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम.!!






0 Comments: