विनामास्क  ३५७ व्यक्तींकडुन तीन दिवसांत पावणे दोन लाख रुपयेदंड वसूल

विनामास्क ३५७ व्यक्तींकडुन तीन दिवसांत पावणे दोन लाख रुपयेदंड वसूल

विनामास्क  ३५७ व्यक्तींकडुन तीन दिवसांत पावणे दोन लाख रुपयेदंड वसूल 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथीच्या वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई पुन्हा कडक कारवाई सुरु केली आहे. १९ ते २१ या तीन दिवसांत केलेल्या या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या ३५७ व्यक्तींकडून एकूण १,७८,४०० रुपये  इतका दंड वसूल करण्यात आला आहे. बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच मास्क अथवा कापड परिधान करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारातकिराणा दुकानमॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावेअसे आवाहन महापालिकेने केले आहे.

0 Comments: