पेट्रोल-डीझेल दरवाढ विरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) मोदी सरकारमुळे महागाई कमी होईल अशा घोषणा दिल्या जात होत्या. परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका राज्याला बसत आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन बॅरलचे दर कमी होऊनही पेट्रोल-डीझेल दर वाढत आहेत. जी आश्वासने मोदी सरकारने दिली होती ती सर्व हवेतच विरली आहेत. सर्वांची फसवणुक होत आहे दरवाढ होत आहे, नागरिक हैराण झाले आहेत. म्हणूनच शिवसेनेने डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात पेट्रोल-डीझेल दरवाढ आणि महागाईविरोधात आंदोलन केले.
शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेश कदम यांचा सहभागाने शिवसैनिकांमध्ये वेगळा जोश होता. ‘हाय हाय मोदी सरकार हाय हाय” “अरे आवाज कोणाचा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चात माजी तानगरसेवक तात्या माने, संतोष चव्हाण, राहुल म्हात्रे, संजय मांजरेकर, वसंत भगत, कविता गावण, वैशाली दरेकर, अमोल पाटील, राजेश कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी राजेश मोरे म्हणाले कि, मोदी सरकारने सर्वांची फसवणुक केली आहे. पूर्वी ६० रुपये पेट्रोल होते आता १०० रुपये झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बॅरल ५० रुपये आहे तरी पण पेट्रोल आणि डीझेल दर कमी होत नाही हे “अच्छे दिन” आहेत का ? सर्वच बाबतीत सर्वांना फसविण्याचे काम सुरु झाले आहे म्हणून आम्ही शिवसेनेच्यावातीने जाहीर निषेध करतो. ज्या ज्या गोष्टीचा अन्याय होईल त्या प्रत्येक गोष्टीचा शिवसेना निषेध करेल असेही मोरे म्हणाले. तर यावेळी राजेश कदम म्हणाले, सुरुवातीला मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. आम्हाला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं आणि आता अशी परिस्थिती आले कि, घरात असलेली बुलेट मोटातसायकल घरी लावून सायकलने बाहेर प्रवास करावा लागत आहे. आता `अब कि बार` आता पुरे म्हणायची वेळ आली आहे. सांगतांना सांगतात जाणतेची दिशाभूल करतात, करांच्या रूपात पैसा गोळा करायचा आणि स्वतःची तुमडी भरायची हा खेळ चालला आहे त्या विरोधात हे आंदोलन असून मोदी सरकारला त्याची दाखल घ्यावी लागेल.





0 Comments: