अरूणा प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्या-
------------------------------------
समाजभूषण सो. ना. कांबळे यांची मागणी
मुंबई-
तानाजी कांबळे हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक आहेत. ते अरुणा प्रकल्पात घरे बुडालेल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून योध्दासारखे काम करीत आहेत. सरकारी अधिकारी, ठेकेदार ,आणि धरणाची घळभरणी करु देणारे गावातील पुढारी यांच्यापासून कांबळे यांच्या जीवितास धोका आहे. पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असतांना यापुवीँ त्यांच्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांच्या जीवाला आजही धोका कायम आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून सिंधुदुर्ग पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त सन्मानित सो.ना.कांबळे यांनी केली आहे.
तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील बेधडक ,लढावू कार्यकतेँ आहेत. ते तत्वाशी तडजोड करीत नाहीत त्यांचे हे कार्य अनेकांना खुपत आहे.परंतु परिणामांची पर्वा न करता ते सिंधुदुर्ग सारख्या अविकसित ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिक पणे काम करीत आहेत.
पुनर्वसन कायद्या प्रमाणे प्रकल्प ग्रस्तांना देय असलेल्या सोई सुविधा न देता या प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांची 130 घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत.गरिबांची घरे बुडविण्याचा अधिकार कोणत्याही कायद्याने कुणालाही दिलेला नाही. असे ही समाजभुषण सो.ना. कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले अरुणा प्रकल्पग्रस्तांची एकजूट अनेकांना नको आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी गेली दोन वर्षे ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी आणि गावातील पुढा-यांनी प्रकल्पात संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाच्या विरोधात तानाजी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. हे सर्व जन आज ना उद्या अडचणीत येणार आहेत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा लढा संवणिण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी समाजभुषण सो.ना.कांबळे यांनी केली आहे.
आपला विनित
रिपाइंचे समाजभूषण
सो ना कांबळे
उपाध्यक्ष ,मुंबई प्रदेश
(रिपाइं आठवले )
Mo.9702992626





0 Comments: