दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी केडीएमसीने उभारली "माणुसकीची भिंत"!
लोकसत्यवाणी न्युज : प्रविण बेटकर
मोबा.-९५९४४०१९२२
डोंबिवली (ठाणे)
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या "ग"प्रभागक्षेत्र येथील टंडनरोड,पुसाळकर उद्यानाच्या गेटशेजारी येण्या-जाणाऱ्यासाठी एक कचऱ्याचे ठिकाण बनले होते.त्यामुळे तेथे नेहमी कचऱ्याचे ढीग आणि गार्डन मध्ये नियमित व्यायाम करण्यासाठी पहाटे आणि संध्याकाळी येणाऱ्या वयोवृद्ध व इतर लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागे तर काहींना दुर्गंधीमुळे वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागत असे.पण प्रसंगावधान होऊन केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी "माणुसकीची भिंत" म्हणून एक वेगळी संकल्पना अमलात आणून तेथील दुर्गंधी नाहीशी करून तेथे वार्डातील रहिवाश्यानी टाकाऊ कपडे इतरत्र फेकून न देता तेथे बनवलेल्या ठिकाणी आणून ठेवावेत जेणेकरून रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या विमुक्तांना किंवा गोर-गरिबांना उपयोगी पडू शकतील त्यातून ते आपली वस्त्र ही मूलभूत गरज पूर्ण करतील.अश्या पद्धतीने ग- प्रभागक्षेत्र येथे एक सुंदर कल्पना चालू केली असून त्यामध्ये देखरेख करण्यापासून आणि संकल्पना अंमलात आणून दुर्गंधीचा नायनाट करेपर्यंत लागणारे कष्ट म्हणजे रामनगर हजेरीशेडचे सी.एस.आय- नरेंद्र धोत्रे, एस.आय- प्रसाद पुजारे, गायकवाड, मुकादम- मुकुंद गरुड, संदीप जाधव, भालेराव यादीचे मोलाचे सहकार्य आणि खारीचा वाटा आहे. ही संकल्पनेला राहिवाश्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले व अजूनही माणुसकी संपलेली नाही हे दिसून येते.स्थानिक लोक सुद्धा व्यवस्थापनाचे आभार मानताना दिसतात.




0 Comments: