आपलेच आपणाक नडतत
जगात नावाजलेले हापूस
आमच्याकडे सडतत
नको राग दुसऱ्यांचो
आपलेच आपणाक नडतत
वाईट बरा ठरत नाय
जात धर्म देशावर
विश्वास नको ठेव रे
ह्या खोट्या द्वेषावर
कर मैत्री दुसऱ्यांशी
आपल्यांसारखी घट
सगळे आपले, दलित मराठा
वाणी किंवा भट
बऱ्याचदा तुझ्या मरणात
तेच लोक रडतत
नको राग दुसऱ्याचो,
आपलेच आपणाक नडतत
मालवणी
नडतत - त्रास देतात
© डॉ सतीश सदाशिव पवार 8108751520
कणकवली
19 जान 2019




0 Comments: