भाजपचे माजी नगरसेवक साई शेलार यांच्या प्रयत्नाने विकास कामे सुरु
डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपचे माजी नगरसेवक साई शेलार यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून चांमुडा गार्डन गटारावर कव्हर्स टाकण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले,कोरोना काळात अनेक विकास कामे रखडली होती. त्या कामांना आता गती प्राप्त होत आहे. या इमारतीच्या विकासकांनी गटारावर झाकण लावणे गरजेचे होते. पण त्यांनी ते काम न केल्याने आता आमदार निधीतून हे काम होत आहे.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी गटारावर कव्हर्स टाकण्याच्या कामांसाठी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चव्हाण म्हणाले, निवडणूकीपूर्वी या विभागात आलो तेव्हा या कामांसाठी अंदाजे खर्च काढला होता. कोरोना काळात विकासकामांच्या निधीला तात्पुरती का होईना स्थगिती होती. त्यामुळे या कामाला थोडासा विलंब झाला आहे. थोडय़ाच दिवसांत कामाला सुरूवात होईल. स्थानिक माजी नगरसेवक साई शेलार हे विकास कामांसाठी मोठय़ा प्रमाणात पाठपुरावा करीत असतात. हा परिसर नव्याने विकसित झालेला आहे. या भागात सर्व व्यवस्था कश्या उपलब्ध झाल्या पाहिजेत याकडे ते नेहमी लक्ष पुरवितात. प्रभागातील भूमिगत गटार तयार करणे व त्या कामांना गती देण्याचे काम खऱ्या अर्थाने कै. शिवाजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. त्याला गती देण्याचे काम त्यांचे सुपुत्र साई शेलार करीत आहे. साई शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम होत आहे. पुढील काळात ही त्यांनी विकासकामे अशीच करीत राहावे ,असे ही त्यांनी सांगितले.





0 Comments: