आर.पी.आय डेमोक्रॅटिक च्या वतीने उद्योग सारथी कार्यालयाचे नामांतर

आर.पी.आय डेमोक्रॅटिक च्या वतीने उद्योग सारथी कार्यालयाचे नामांतर

 आर.पी.आय डेमोक्रॅटिक च्या वतीने उद्योग सारथी कार्यालयाचे नामांतर

MIDC ला आकृती हब टाऊन विकासक कार्यलयाचा बोर्ड




मुंबई दि (प्रतिनोधी) झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत एम.आय.डी.सी परिसरात उपक्रम राबविण्यात आहे त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून उद्योग सारथी कार्यालय गोर गरिबांचे काम न करता विकासकाचे काम करत असल्यामुळे संतप्त झालेल्या आरपीआय डेमोक्रॅटिक च्या पदाधिकाऱ्यांनी एम आय डी सी कार्यालयाचे नामांतर केले.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी मुजोर कार्यालयाला आकृती हब टाऊन विकासक कार्यलयाचा बोर्ड लावून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.


डॉ राजन माकणीकर यांच्या नेतृत्वात व कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशानव्ये बंजारा सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड यांनी केले होते. मात्र: कोविड मुळे पोलीस प्रशासनातर्फे मोर्चा ला परवानगी नाकारली व शिष्टमंडळ भेटीची विनंती केली. 

कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक जगदीश शिंदे प्रकल्पात घुसखोरी करविलेल्यांचा मास्टर माइण्ड शोधण्याचे आश्वासन दिले व उद्योग सारथी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून देण्याची ग्वाही दिली.

प्रकरणी उद्योग सारथी च्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन भाडे धनादेश, घुसखोर, जुन्या लोकांची फेरतपासनी, लॉटरी सोडत व महादलाल विकासक व भ्रष्ट अधिकारी याविषयी चर्चा झाली.

चर्चेत पो.नि सुर्वे, प्रकल्प अधिकारी संतोष करंडे, उपअभियंता अंबोरे, सहा अभियंता निकाळजे या अधिकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या शिष्टमंडळात आंदोलनाचे नेतृत्व डॉ. राजन माकणीकर, अध्यक्ष कॅप्टन श्रावण गायकवाड, प्रवक्ता  व उपाध्यक्ष वसंत कांबळे, युवा सचिव विजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, नाना कांबले, संतोष उपाध्याय, आदी पदाधिकारी उपस्तिथ होते,

कार्यक्रमाच्या यशवितेसाठी 

अंधेरी युवा शहराध्यक्ष आकाश रावते, बाला सुब्रमण्यम यांनी अथक परिश्रम घेतले.

मार्च च्या १० तारखेपर्यंत प्रश्नांचा उलगडा होऊन मास्टर माइण्ड अटक न झाल्यास आजचा मोर्चा मार्च मध्ये घेण्यात येईल असा इशारा डॉ राजन माकणीकर यांनी  सक्षम अधिकारी करंडे व उपअभियंता अंभोरे यांना दिला.

0 Comments: