कविता : चला जाऊ बाजाराला
--------------------------------------
बायको म्हणाली नवर्याला
चला आपण जाऊ बाजाराला
तूम्हाला काही कळत नाही
मी येते तूमच्या सोबतीला
नवरा म्हणाला बायकोला
मी लहान आहे का आता
आयुष्य गेलं यात माझं सारं
बाजार आणता आणता
अहो, पण कसं नाही म्हणत
मी काय म्हणते ते जरा ऐका
तूम्ही काहीतरी विसरून येता
म्हणून म्हणते एकटे जाऊ नका
मागच्या वेळेस गोडतेलाच्या
डब्यात खोबरं तेल आणले
मी पण होते खूपच घाईघाईत
भाजीच्या फोडणीला टाकले
एके दिवशी तर म्हणे तूम्ही
स्वतःची फजिती करून घेतली
दुकानदाशी भांडण करून
साखरेऐवजी मिरची पूड आणली
प्रत्येक वेळी काहीतरी विसरता
आल्यावर मलाच दमदाटी देता
मला घेऊन तर चला एकदा
तूम्ही तर फार शहाणी म्हणता
नवरा बिचारा साधा विसरभोळा
शेवटी त्याचा नाईलाज झाला
गूपचिप मानेने होकार देऊन
बायकोला घेऊन बाजाराला गेला
दताहरी एकनाथराव कदम
मू.पो.मातुळ ता.भोकर
जि.नांदेड
9764961245





0 Comments: