नरडवे धरणग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक आश्वासन

नरडवे धरणग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक आश्वासन

 नरडवे धरणग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत यांचे सकारात्मक आश्वासन

 *मुंबई :*  मुंबई मंत्रालय येथे आज दि.11फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत,  प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत नरडवे धरणग्रस्त शिस्टमंडळाची आज उदय सामंत यांच्या दालनात बैठक पार पडली.

       या  सकारात्मक चर्चेत अनेक   मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल,असे प्रकल्प अधिकारी यांच्या समक्ष सांगून तसे त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत,  लवकरात लवकर धरणग्रस्त यांची उर्वरित काने पूर्ण करावीत असे  पालकमंत्री यांनी प्रकल्प अधिकारी यांना बजावूनसांगीतले आहे, आठ दिवसांत धरणग्रस्त यांचे प्रश्न मार्गी लागले पाहीजेत, असे पालकमंत्री यांनी प्रकल्प अधिकारी यांना खडसावून सांगितले आहे. मात्र यावर धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ यांनी वरील कामे आठ दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास धरणग्रस्त पुन्हा चालू असलेल्या धरणाचे काम रोखतील असेही प्रकल्प अधिकारी व पालकमंत्री यांना सांगितले आहे. 

आजच्या या सकारात्मक  बैठकीत संदेशभाई पारकर, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख पथमेश सावंत, दीपकभाई केसरकर, आमदार रविंद्र पाठक, इत्यादी मान्यवर या चर्चेत उपस्थित होते. या बैठकीला धरणग्रस्त समितीचे पदाधिकारी मारुती ढवळ, लुईस डिसोझा, प्रकाश सावंत, प्रभाकर ढवळ, शामराव सावंत, मधुकर पालव, सुरेश पालव, अशासकीय सदस्य संतोष सावंत, आशिष कोळगे, गणपत चव्हाण, कवी संतोष सावंत, वैभव नार्वेकर, गणेश ढवळ,उदय मेस्त्री, दिवाकर राणे व इतर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments: