"व्यथा बिनपगारी सेवा करणाऱ्या जीवनाची"
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
(घनकचरा व्यवस्थापन)
कंत्राटी वाहनचालक/कामगार
कचरा गाडी जवळुन जाता
नाकी रूमाल लागतो ना ?? 😷
त्या कचऱ्यात आमचा योध्दा
दिवस रात्र राबतो ना!!
कोरोनाच्या महामारीत
दुनिया सारी लपली ना !
तळ हाताच्या फोडावानी
आम्ही कल्याण डोंबिवली जपली ना !! 🤲
दहा महिने झोप नाही
दोन लाख डोळ्यांना,
रात्रंदिवस कर्तव्यावर
विसरुन पोटच्या गोळ्यानां !!😢😢
दोनशेच्या वर शहीद झाले
करता करता सेवा,
विरांना त्या नका विसरू
भान तयांचे ठेवा !! 🙏🙏
प्रेता-गृह,स्मशान भूमी
कुणी ना केला खाडा,
अग्निशमन, सुरक्षा दल
उभे देवुनी वेढा !!🔥👨🏻✈️
पाणी पुरवठा, औषधं पाणी
कुठे न पडला खंड,
क.डों.म.पा.ने कोरोना विरूध्द
केले निर्भय बंड !! 🤼
आम्ही केली निष्पृह सेवा
कल्याण डोंबिवली आमची आई,
रोज ठेवितो माथा आम्ही
क.डों म.पा. च्या पायी !!💐💐
दिन रात ही करीतो सेवा
ऐका कल्याण डोंबिवली वाले,
तीन चार महिने उपाशीपोटी सेवा
अधिकारी खातात आमचा मेवा..!!
एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका
वाहनचालक ( #PNB# )





0 Comments: