माजी नगरसेवकाच्या आईची हत्या ...

माजी नगरसेवकाच्या आईची हत्या ...

 माजी नगरसेवकाच्या आईची हत्या ...

     क्षुल्लक कारणाववरून पतीने केली हत्या... 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या ८० वर्षाच्या आईची क्षुल्लक कारणावरून पतीने धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली. हि घटना शनिवारी रात्री उशिरा डोंबिवली पूर्वेकडील कल्याण –शिळ रोडवरील गोळीवली गावातील कुलदैवत बांगला येथे घडली. या घटनेत वृद्ध पतीस मानपाडा पोलिसानी अटक केली आहे.एका वृद्ध पतीने आपल्या वृद्ध पत्नीची हत्या केल्याचे वृत्त शहरात पसरल्याने चर्चा सुरु झाली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,बळीराम पांडुरंग पाटील ( ८४ ) असे हत्या करणाऱ्या वृद्धांचे नाव आहे.त्यांची सून प्रतीक्षा पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.बळीराम याचा अत्यंत तापत स्वभाव असून पत्नी पार्वती पाटीलबरोबर छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत होती. भांडण इतके विकोप्याला जायचे कि अनेक वेळेला बळीराम यांनी पत्नीला मारहाण करून मारण्याची धमकी दिली होती.शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे कुटुंबीय जेवून झोपी गेले. रात्री उशिरा सासऱ्याच्या रूममधून धूर बाहेर येत असताना सून प्रतीक्षा पाटील यांना दिसला.प्रतीक्षा यांनी खिडकी उघडली असता जमिनीवर सासू पार्वती निपचित पडली होती. दरवाजा उघडल्यावर पार्वती यांच्या नाकावर,चेहऱ्यावर आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस वार केलेल्या आणि अर्धवट अवस्थेत जळलेला मृतदेह दिसला.प्रतीक्षा यांनी घरातील कुटुंबियांना बघितलेला प्रकार सांगितल्यावर त्यानी मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.बळीराम पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.    

0 Comments: