अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप
डोंबिवली ( शंकर जाधव ) रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यकर्ते आणि रूग्णांनी अंकुश गायकवाड यांना उदंड आयुष्य लाभो या शब्दात शुभेच्छा देऊन दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या. त्यानंतर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडे थोरपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मीना साळव, वैशाली सावर्डेकर, युवक आघाडीचे विकास खैरनार , शहर सचिव समाधान तायडे, शहर उपाध्यक्ष बलखंडे, विठ्ठल खेडकर, उपाध्यक्ष दिलीप काकडे, शिवाजी वाठोरे आदी मान्यवर उपस्थित होते.





0 Comments: