डोंबिवलीतील मनसैनिक बनला मराठी उद्योजक
डोंबिवली ( शंकर जाधव ) मराठी तरुणांनी व्यवसायात येऊन इतर मराठी मुलांना हात देऊन त्यांच्या यशस्वी जीवनाला आणखीनच गतीला मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच प्रयत्न केले. मनसेतील प्रत्येक कार्यकर्त्या मोठा व्हावा म्हणून पक्षातील नेतेमंडळी त्यांना प्रोत्साहन देत असतात.अशाच डोंबिवलीतील एका मनसैनिकाने उद्योजक जगात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे .मराठी उद्योजक बनून या मनसैनिकाने दाखवून दिले आहे कि मनसेत आल्यावर कार्यकर्त्यांना व्यवसायात आपले नाव करता येते.डोंबिवलीतील अरुण जांभळे यांनी हे करून दाखवल्याने त्यांचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील कौतुक केले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथील जिमखाना रोडवरील ओम साई कॉ.ऑ. सोसायटी लिमिटेड, दुकान नं.०१ येथे मनसैनिक अरुण जांभळे यांनी श्री राज अॅग्रो यांच्या माध्यमातून या नावाने आपला व्यवसाय सुरु केला आहे.आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या हस्ते या व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाहर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, प्रदेश सचिव उर्मिला तांबे,डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, शहर संघटक योगेश पाटील,हरीश पाटील,योगिनी पाटील,अमित सुलाखे,संदीप ( रमा ) म्हात्रे,समीर पालांडे,रमेश यादव,सुमेधा थत्ते,कौस्तुभ लिमये,वल्लभ चितळे,गणेश कदम,मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यासह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.यावेळी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी यावेळी मनसैनिक अरुण जांभळे यांना व्यवसायात पुढील वाटचालीसाठी शुभे दिल्या.तर जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी जांभळे यांच्या या कामाचा आदर्श सर्व मराठी तरुणांनी घेऊन आपल्या पायावर उभे राहावे असे सांगितले.





0 Comments: