डोंबिवलीतील सारिका शिंदे यांना तानुबाई बिर्जे पुरस्काराने सन्मानित

डोंबिवलीतील सारिका शिंदे यांना तानुबाई बिर्जे पुरस्काराने सन्मानित

 डोंबिवलीतील सारिका शिंदे यांना तानुबाई बिर्जे पुरस्काराने सन्मानित



  डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकहिद गौरव पुरस्कार २०२१ आणि लोकहिद न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त शहापूर येथील कुमार गार्डन येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात `आपला भगवा`साप्ताहिकाच्या संपादिका सारिका शिंदे यांना तानुबाई बिर्जे स्मृती लक्षवेधी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. लोकहिंद न्यूज चॅनलच्या संपादक महेश धानके आणि कार्यकारी संपादक लक्ष्मण घरत यांनी आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात  माजी आमदार पांडुरंग बरोरा, सुभाष पवार आनंद भागवत शेखर,धर्मगुरू फुलनाथ बाबा, डॉ. दिलीप धानके,अपर्णा खाडे,रत्नप्रभा तारमाळे, शंकर खाडे,तारुलता धानकेसंजय निमसे,जगन्नाथ पष्टे, काशिनाथ तिवरे आदि मान्यवर उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त मैत्री कल्याणकारी संस्थेच्या वतीने सन्मान,जर्नलिस्ट युनियन ऑफ संघटनेच्या वतीने २०१८ पुरस्कार, आयकॉन प्रतिष्ठानच्या वतीने महिला संपादिका पत्रकारिता पुरस्कार, साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठान उल्हानगरच्या मुक्ता साळवे पुरस्कार,ठाणे वैभवच्या जागतिक महिला दिनानिमित पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्काराने सारिका शिंदे यांना गौरविण्यात आले होते.या सोहळ्याचे संपादक महेश धानके यांनी सूत्रसंचालन केले.

0 Comments: