ठाण्यातील कोठारी कंपाउंड येथील नामांकित हॉटेल मध्ये फायरिंग..दोन जण अटकेत..

ठाण्यातील कोठारी कंपाउंड येथील नामांकित हॉटेल मध्ये फायरिंग..दोन जण अटकेत..

 ठाण्यातील कोठारी कंपाउंड येथील नामांकित हॉटेल मध्ये फायरिंग..दोन जण अटकेत..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


ठाणे:  दि. २८ फेब्रुवारी ला रात्री १२:३० वाजता ठाण्यातील एका पब मध्ये आलेल्या दोन गिऱ्हाईकांच्या भांडणाचं पर्यावसन हाणामारी मध्ये झाले व त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली, या बद्दल मिळालेली थोडक्यात हकीकत अशी अभिमन्यू निंबाळकर व जय दखणा हे दोघे पब मध्ये आले होते त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रितेश शेट्टी या दुसऱ्या गिऱ्हाईका बरोबर या दोघांचे भांडण व बाचबाची झाली व त्याचे रूपांतर मारामारी मध्ये झाले, त्या दरम्यान अभिमन्यू निंबाळकर याने रितेश शेट्टीला तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून एअर रायफल मधून हवेत गोळीबार केला, या प्रकरणी चितळसर पोलीसांनी अभिमन्यू निंबाळकर व अजय दखणा या दोघांना अटक केली आहे व त्यांच्या कडून एक एअर गन, तलवार, एअर रायफल व ब्रेझा कार जप्त करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

0 Comments: