कविता : निसर्ग
कोकणची शान हिरवे हिरवे रान
वाट नागमोडी डोंगर ही छान ||धृ||
उंच उंच पर्वत सह्यादीच्या रांगा
आकाशी भिडला पर्वत कसा सांगा
आनंद देइ मना निसर्ग हा महान ||१||
कडे कपारीतून सरिता हि येते
नागमोडीत धावत ती सूटते
साऱ्या पशू प्राण्यांची भागविण्या तहान ||२||
उकळ उठे आनंदाची वाटे मनाला
काय वरणावे ह्या अधभुत क्षणाला
मनी साठवावे नरेश असमरणिय सन ||३||
- कवी नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो.७५१७३८९७४६





0 Comments: