कविता
जाणले ते मी सारे
जाणले ते मी सारे
टाळसी मज बोलण्यास ।
पण मीच वेडी
ध्यास तो तुझात बोलण्यास ।
लागले ते वेड जिवास
फुलपाखरू गुंजते ते ।
तुझ्याच त्या ह्रदयात
का भाबडे मन ते।
का मग काटयास
गोजांरून फुलास ते ।
आपलस मनात म्हणते
विषास ते अमृत समजते
प्रतिभा केदार पवार




0 Comments: