नमस्कार वाचक प्रेक्षकहो आज गणेश चतुर्थी या निमित्ताने आपणा सर्वांना, गणेश भक्तांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे यंदाही आरती संग्रह प्रकाशित केले आहे
समाज प्रबोधन व जनजागृती अर्थातच भक्तांमध्ये असलेली भक्तीची ओढ,आवड अधिक वाढावी या या उद्देशाने 2000 सालापासून चालू असलेल्या या संकल्पाला यंदा 21 वर्षे पूर्ण होत आहे. श्रीगणेशाच्या कृपेने, आईवडिलांच्या पुण्याईने, सद्गुरू गगनगिरी नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने,प्रेरणेने आणि आपल्या सारख्या थोर सृजनशील भाविकांच्या सहकार्याने गेली 21 वर्षें अविरतपणे सेवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथू या तत्वावर ही सेवा चालू आहे,
यंदा 21 व्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही गणेशाच्या कृपेने तो प्रयत्न कुठे कमी पडू दिला नाही, घरोघरी आरती संग्रहाची प्रत देता आली नसली तरी एक नामी शक्कल लढवली आणि डिजिटल सुबक आरती संग्रहाची आवृत्ती ची pdf file ऑनलाईन व्हाट्सअप द्वारे सर्व भाविकांना देण्याचा प्रयत्न केला आहे,तसेच लोकसत्यवाणीच्या वेबसाईटवर ही आरती बुकाची pdf file अपलोड करून ही ठेवलेली आहे
तसेच ज्यांनी ज्यांनी आपल्या घरचे किवा मंडळातील श्रीगणपतीच्या मूर्तीचे फोटो पाठविल्यास चॅनेल वर दाखविले जाईल
तसेच गणेशोत्सव या काळात अनेक भजनी व हॊसी गायकानी पारंपरिक एखादा अभांग , गाळण किंवा भजनाचा व्हिडीओ करून पाठविल्यास चॅनेल वर आपणास प्रसिद्धी दिली जाईल
आमच्या सर्व वाचक प्रेक्षकांना, गणेश भक्तांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा





0 Comments: