आपली मुंबई
मुंबई होती किती सुंदर
स्वस्त व निर्सगमय शहर
आता केलय तेथे राजकारण
आजार आणि महागाईने कहर
इकडे लाेकं आता नाही
देत कोणा गरीबाला भाव
महागाईने आता कोणी
आपुलकीने विचारत नाही की
“खातो का रे वडापाव”
झाली आहे फक्त प्रोपर्टी
आणि पैशाची हाव
सकाळ झाली की सर्व
घेतात ट्रेनकडे धाव
किती मस्त होती
ती चौपाटीवरची भेळ
आता इथे कोणालाच नाही
चौपाटीवर जाण्यासाठी वेळ
समुद्र किनारी बागडायला
जायची मुले चौपाटीला
आता समुद्र किनारी थांबतात
पाहुन “ नाे एंन्ट्री”च्या पाटीला
मुसळधार पावसात किती पण होऊदे मुंबईची तुंबई
सिद्धीविनायक, महालक्ष्मी व
इतर देवादेवींच्या आशिर्वादाने
खंबीरपणे उभी आहे आपली मुंबई !!
कविता लेखन : सागर प्रफुल्ल म्हात्रे
२५/०८/२०२०






खूप सुंदर
ReplyDelete