एक चांगला कार्यकर्ता हरपला

एक चांगला कार्यकर्ता हरपला

   एक चांगला कार्यकर्ता हरपला

  मोबाईल हातात घेतला आणि व्हाट्सअप चाडीत बसलो एक धक्कादायक बातमी डोळ्यांसमोर आली ती म्हणजे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते डी एस गायकवाड यांचे दोन नंबरचे चिरंजीव प्रशांत गायकवाड हे covid-19 च्या विळख्यात सापडून त्यांची जीवन यात्रा समाप्त झाले हे बघितल्याने आणी धक्काच बसला आणि आपोआप डोळ्यातून पाणी आले.

प्रशांत खूपच चांगला मुलगा होता. तो निस्वार्थी होता. तो प्रेमळ होता. त्याच्या अंगी प्रेम, दया, करुणा, ठासून ठासून भरली होती. त्यांच्या अशा दुःखद बातमी मुळे मन गहिवरून आले त्याचे वागणे डोळ्यापुढे येऊ लागले तो आठवू लागला त्याचे सारे परिवार आठवू लागले.

मान्य. दशरथ गायकवाड यांची मूर्ती डोळ्यासमोर येऊ लागली गायकवाड साहेबांनी आपले तिन्ही मुलांना खूपच चांगले संस्कार केले आहेत. त्यातून प्रत्येक मुलगा तावून सुलाखून निघाले आणि समाजातच नव्हे, तर जनमानसात लोकप्रिय झाले त्यातून ते प्रत्येक माणूस त्यांना जोडले जात होते आणि ते लाखो लोकांच्या सान्निध्यात राहून निस्वार्थीपणे सेवा करत राहिले आहेत.

गायकवाड कुटुंबाची आणि माझी ओळख पंचवीस वर्षांपूर्वीची डी.एस यांचे टेलर चे दुकान जकात नका भिवंडी येथे त्यांचा मोठा मुलगा प्रमोद(दादा)दुसरा मुलगा प्रशांत तर तिसरा मुलगा Adv प्रतिक हे तिघी समाजाची सेवा करताहेत आज अचानक प्रशांत जाण्याचे कळल्यामुळे माझे मागचे दिवस आठवले मी मुंबईला नविन आलो होतो पण माझे भाचे Adv नाना अहिरे भिवंडीत कोर्टात वकीली करत असल्याने नानासाहेब सोबत आलो भिवंडीत तेव्हा टाॅयपिंगचे निमित्ताने ते नेहमीच प्रशांत गायकवाड यांच्याकडे टायपिंगचे कामा निमित्ताने जात असत पण काही दिवसातच गायकवाड यांच्या  दुकानावरती एक माला रिकामा होता त्यांच्याकडे येत असल्याने आणि गायकवाड कुटुंब आणि अहिरे वकील यांचे चांगले जमत असल्याने डी. एस. गायकवाड यांनी अहिरे साहेबांना म्हणाले तुम्ही माळा बनवून येथे ऑफिस चालू करावे तुमची मदत समाजाच्या साठी ही होईलअसे सांगितले आणि नाना अहिरे यांनी लगेच आपल्यासाठी ऑफिस तयार करून चालू केले. मात्र त्यांच्यात काय घेणेदेणे ठरले ते मला माहित नाही मात्र ऑफिस झाल्या दिवसापासून मी नेहमी तेथे नित्यनेमाने बसू लागलो काही दिवसापूर्वी डी.एस.गायकवाड यांनी आपल्या टेलरचा व्यवसाय बंद करून प्रशांत व प्रमोद साठी टाॅयपिंग सुरू केला डी.एस नेहमी दुकानात हजर राहत असत आणि आपल्या मुलांना काही अडले नडले त्याची पुरत्ता करत असत.

माझी प्रमोद आणि प्रशांत गायकवाड यांच्याशी रोजची भेटू होऊ लागली समवयस्क असल्याने त्यांची आणि माझी मैत्री झाली तसेच दशरथ गायकवाड हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी समाजाच्या भल्यासाठी व समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत ते भा‌. री. प.च्या प्रचारासाठी नेहमी समाजात आणी जनमानसात जागृती अभियान राबविण्यात ध्यने मानतात.

दसरथ गायकवाड यांचे दुकान जणू आंबेडकर चळवळीचे केंद्र झाले होते. तेथे रोज अनेक सामाजिक कार्यकर्ते जमत आणि चळवळीचे प्रामाणिक काम करत असत अनेक सामाजिक संस्था अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तेथे जमले चळवळी विषयी सल्ला मसलत करत सल्लामसलत करतात अशा त्यांचे दोघे मुले येणाऱ्या लोकांची सेवा करत असत आंबेडकर चळवळीत सहभागी होत असत.

चळवळीचे लोकांना कुठेले कागदपत्रे किंवा अर्ज लागेल तर ते वेळ न घालवता लगेच ते तयार करून देत असत नेहमीच मी ऑफिसात असल्यामुळे हे सारे त्यांचे सहकार्य बघत आलो आहे. त्यांची नेहमीच समाजासाठी काहीतरी करत असण्याची धडपड मी बघत आलो आहे.

मी नवीन असल्यामुळे मला त्यावेळी त्यांचे असे निस्वार्थी कार्य बघून मोठे आश्चर्य वाटायचे त्यांचा आदर्श वाटायचा मला तर नेहमीच यांचे सहकार्य लाभले आहे मी नवीन असल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत असायच्या आणि माझी अडचण दूर करायचे मग ती पैशांची असो या ती खाण्यापिण्याची नेहमी सहकार्य करत असायचे वेळप्रसंगी माझ्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नसायचे तर नेहमी गायकवाड कुटुंबातील मदत होत असे आणि त्यातून मला अनेक सहकार्य त्यांच्याकडून मिळत असायचे.

खरोखर माणसाचे जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे हे निश्चित आहे कधी कोण जाईल याचा नियम नाही जो काही ईहीलोक सोडून जातो जो व्यक्ती चांगले काम करून  गेला त्याची मागेही चांगल्या कामाची चर्चा होत असते आणि त्याची कीर्ती जगभर पसरलेल्या आपल्या दिसते काही काही लोक म्हणतात नावात काय ठेवलय पण तसं नसतं माणसाने जीवनात केलेल्या चांगल्या कर्माची सदा चर्चा होत राहते आणि ती चर्चा जेव्हा जेव्हा विषय निघाला तेव्हा तेव्हा त्याचे नाव आपोआप ओठांवर येते हीच समाजात चांगले कार्य करण्याची पोच पावती असते.

कोरोनाव्हायसर मुळे हजारो लोक मृत्यू पावली आहेत काही काही लोक तर कोरोनाच्या भितीनेच मेले.व काही लोकांनी तर कोरोनाणी लागन झाली ते डॉक्टरांना व दवाखान्याच्या खर्चाला घाबरुन दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले नाही त्यांनी हा जीवघेणा आजार अनेकांनी अंगावर काढला म्हणून ते वाचू शकले नाहीत 

आशा वेळेला जवळ पैसे नसले तरी सरकारी दवाखाना आहेत त्यात जावून आपल्याला कोरोना व्हायरस पासून वाचने गरजेचे आहे .कोरोना झाला आणि आपल्याला लोक काय म्हणतील याची भिती बाळगत बसलो तर खरोखर आपला शेवट निश्चित आहे म्हणून म्हणतोय सरकारी तर सरकारी आपला जीव वाचवने फारच गरजेचे आहे. आपल्यावर आपले संपुर्ण कुटुंबाची धुरा आहे आपण कोरोनाने गेलो तर किती मोठे नुकसान आहे जे कधीना भरुन निघणारे आहे हलगर्जीपणामुळे आपलेच नुकसान होणार आहे .घरात राहीले तर कोरोनाच्या भितिने नाहाक बळी जाल.

प्रशांत गायकवाड कोरोनाव्हायरस मुळे आपल्या सोडून गेले याचे मोठे दुःख त्यांच्या परिवाराला झाले आहे तेवढेच दु:ख आंबेडकरी समाजाला झाले आहे एक चांगला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून जनमाणसाच्या अंतःकरणात त्यांचे नाव वेळोवळी आपोआप ओठांवर येतं राहील हे मात्र सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे .

या माझ्या निस्टावंत जिगरबाज मित्राला हरहुन्नरी आंबेडकरी कार्यकत्या जगदेव परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

                                              जगदेव भटू हरचंद

                                              7057586632

0 Comments: