

मुंबई..( प्रतिनिधी ) सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था गेली ५० वर्षा पासून बहुविकलांगांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करीत असून,लाॅकडाऊन काळात बुधवार दिनांक २६/०८/२०२० रोजी गरीब गरजू कुटुंबांना धान्याचे किट तसेच मास्क वाटप करण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री अय्यर,व्यंकटेश अय्यर व रुग्ण मित्र- समाजसेवक विनोद साडविलकर,राजेश शिर्के,विजय माने,विनोद गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यापूर्वी अनुक्रमे २७ एप्रिल,२४ मे, २५ जून, २५ जुलै, २६ आॅगस्ट पर्यंत १५०० गरजू कुटुंबांना, धान्याचे किट तसेच मास्क, पार्लेजी बिस्कीट वाटप करण्यात आले. उपस्थित कुटुंबांनी सामाजिक अंतर व मास्क अनिवार्य असल्यामुळे सुचने प्रमाणे पालन केले.
सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने विश्वस्त संदीप अग्रवाल आणि रोहित पुगालिया,जयश्री अय्यर, व्यंकटेश अय्यर,नवनीत फाउंडेशन यांनी धान्याच्या किटसाठी व पार्ले जी कं.बिस्कीटासाठी मदत केली. संस्थेच्या हेड इन्चार्ज मंजुषा सिंह,सहकारी कर्मचारी राजू गोल्लार,हेमांगी पिसाट,शशी फडके इ. कर्मचारी,हितचिंतक यांच्या विशेष पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी झाला.





0 Comments: