गाठोडे *2    भाग १७ वा

गाठोडे *2 भाग १७ वा

 *गाठोडे *2

                भाग १७ वा 

     भटू निघाला होता आपल्या सासरवाडीला मनात खुप चित्रविचित्र विचार थैमान घालत होते. आंबिवली स्टेशन पर्यंत येउन पोहोचला होता. एका जागी बसून त्याला स्वस्थ बसवत नव्हतं. मग तो तिथून उठून पेपर स्टॉल कडे गेला नवाकाळ हातात घेत तो परत स्टेशनवर आला आणि एका जागी बसून पेपर चाळू लागला मात्र तरी देखील त्याचे मन त्याला खात होते. काय करावे, कसा जबाब द्यावा सरिता बाईला हेच त्याला कळत नव्हतं. जीवनाची प्रत्येक रेसर तो हरल्यासारखे त्याला वाटत होतं. आता कुठं तो स्थिर झाला होता परंतु तरीही त्याचा पाठलाग त्याचे गत आयुष्य घेत होते कसं करणार, कसं राहणार, कसं जगणार, तिला माहिती झालीतर ती काय म्हणेण, जीवनाच्या प्रत्येक गोष्टी तो बघत चालला होता आणी मागचे जीवनात काय घडल त्याने पुर्णताहा मागे सोडून तो सरळ मार्गाने चालणे पसंत केले होते पण भुतकाळात त्याने केलेल्या चुका आता डोकेदुखी ठरवून एक वादळ निर्माण झालं होतं आणि त्याच्या पहिल्या बायकोने डोकेवर काढलं एखाद्या जुणाट आजाराने डोके वर काढावे तसे त्याच्या बायकोने डोकं वर काढलं होतं आणि तिने थेट संपर्क साधला होता. आणी म्हणाली, "भटू आता मला कोणी आडवू शकत नाही, तुझ्याकडे यायला ! भटूने हे शब्द एकले,  हे शब्द ऐकून भटूची धांदल उडाली होती लग्न केल्यामुळे तो आपला भुतकाळ हळूहळू विसरु लागला होता .आणी तो लग्न करुन आनंदीत होता पहिले लग्न दोन वर्षांपूर्वी विसरून गेला होता. मनातल्या मनात म्हणाला, हे काय आता नवीन परंतु त्याने आपले मन घट्ट करुन घेतले होते आता काही ही होवो, 'मान उखडात फसली आहे ती तुटतो या फुटो, ! म्हणून मनू जेव्हा त्याच्याकडे आली होती तेव्हाच त्याने तिला स्पप्ट शब्दात नकार दिला होता. तेव्हा भटू मनूला म्हणाला, होता 'मनू तू खूप उशिर केला ग, ? तेव्हा मनूची हालत " धोबी का कुत्रा न घर का ना घाट का" अशी झाली होती. तिने आपले संपूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी तळमळून रोजच जळन होती आणी त्यानेच तिला नकार दिला होता म्हणून ती संतापली होती. कोद्रीत झाली होती.हे तीचे संतापणे ठिक होते मात्र प्रेमा पेक्षा बापाच्या शब्दाला ती, जागत आली होती. तेव्हाच ति भटूकडे आली असती तर तिच्या नशिबी हे आले नसते.आणी भटू कुठे चूकला होता तो तर तिच्यासाठी पुर्ण एक तप वाया घातले होते. जो माणूस एक तप आपल्यालासाठी थांबू शेकतो त्याच त्याच्या आनंदा करीता भटूला लग्न करुन घे म्हणून सांगीतले होते .मात्र तेव्हा 'भटू मनूकडे गयावया करत होता म्हणत होता नको की,मनू तू असे करु नकोस मी तूझ्यासाठी थांबू शकतो पण तू मला असे दुर नको ग सारु, तिलाही त्याचे असे घडी घडी जम्मूला येणे बघीतले जात नव्हते कारण तीने त्याला वचन दिले होते. जेव्हा माझा बाप मरेल तेव्हा मी तुझ्याकडे येईल असे सांगितले होते आणि ते आज तिने पुर्ण केले होते.मात्र इकडे भटूने मनूच्या सांगितल्यामुळे त्याने विवाह केला होता. म्हणून तो आता मनूला नकार देत होता त्याच्याकडे प्रर्याय दुसरा नव्हता म्हणून त्याने जिवापाड प्रेम करत असलेले आपल्या प्रियेला नकार दिला होता.

       लोकल आली होती आणी भटू हातात पेपर सांभाळत लोकल मधे घाईघाईत चळला होता जीवाची जी घालमेल होत होती ती वेगळीच होती. भांडूपला दुस-यादा जावून काय बोलावे त्याचाच विचार करत होता तो पण  सासू बाईला त्याने शब्द दिला होता की, मी येणार आहे. भटूच्या मनात आले मनू तर माझी आतुरतेने वाट बघत राहीली असेल केसे तोंड द्यावे तिला काय सांगू की, मी नेहमी प्रेम करत आलो आहे आणी तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे. नाही मी तिला असे म्हणूनच शकत नाही मी तिच्या मनाला समाधान लागावे त्यासाठी ही म्हणार नाही मी असे म्हणूच शकत नाही. 

     विचारांच्या गोंधळात कधी भाडूप आले त्याला समजले नाही.तो रेल्वे स्टेशनवरुन तो रिक्षाकडे वडला आणी रिक्षावाल्याला म्हणाला भाऊ नाळकर्णी निवास रिक्षावाले आपले रिक्षाच्या मिटरला हातलावत बसा म्हणाला, रिक्षा निघाली होती नाळकर्णी निवासाच्या दिशेने भटूचे मनात खलीवली चालू होती दिशाहीन मन त्याचे त्याला थोडे धिर देत होते म्हणत होते भटू तू काळजी करु नकोस मनाला साभाळ तू यातून निट पणे सावरु शकतो.

    भटू नाळकर्णी निवासा जवळ येऊन पोचला होता मन त्याचे घरात जाण्यास धजत नव्हते पण नाईलाजास्तव तो घरातल्या गेट जवळ येवून पोचला होता. गेट जवळ येताच कुत्र्याने त्यांचे भुकून स्वागत केले आणी कुत्र्याचे भुंकणे ऐकून दरवाजा लोटत वहीणी बाहेर आलेल्या आणी आपल्या सासूबाईंना आवाज देत आई आई कोन आले बघा भटू भाऊजी ! भटूला या या म्हणत वहीणीने स्वागत केले.भटूने थोडे सिमित केले आणी घरात शिरला मनू

पाण्याचा ग्लास घेऊन भटूच्या हातात देत म्हणाली,भटू कसा आहेस.

     भटू म्हणाला, मी,बरा आहे तू कशी आहेस मनू म्हणाली, माझे काय विचारतो मी कशी असणार वाकडे तिकडे तोंड करत जीवंत आहे. आजुतरी मेली नाही.

भटू मनोमन समजला होता आपण ईच्या तोंडाशी लागलो तर हि मला असेच उत्तर देईल भावनीक होईल म्हणून त्याने  गप्प राहण्याचे ठरवले होते पण मनात भुतकाळात काय काय या घरात त्याच्या बाबतीत घडले ते त्याच्या डोळ्यात पुढे येत होते .आणी बिजूशेठ त्याला आठवत होता.त्याच्या मनात आले आज बिजूशेठ राहीले असते तर मला या घराची पायरी तरी चळू दिली असती का ? त्यांनी म्हटले असते" हे महारा माझे घर बांटू नकोस,तुझ्या स्पर्शाने माझे देव बाटतीत शुद्रा चालता हो माझ्या घरातून ,"योगा योगाने गेले बिचारे चांगले झाले नाही या घराचे एक खांब होते. तेवढ्यात भटूची सासूबाई आल्या आल्या आपूलकीने म्हणाल्या भटू फ्रस हो बघू, आण्णांना निरोप देते तू आल्याचे तेच तुझ्याशी बोलणार आहेत.

भटूला आठवले ज्या दिवशी बिजूशेठने त्याला मोटारगाडीने उडवले होते.तो मनातल्या मनात थोडा भानावर येत खरोखर बापजादाची पुण्याई तर वाचलो नाहीतर सास-यानी पहीले माझा राम बोलो बही राम केले असते. त्याने त्या दिवशी दामू आण्णाचे मन जिंकले होते. दामू आण्णांनी त्याना वचन दिले होते की, मी तुम्हाला मदत करणार म्हणून.भटूची एकदम अंतस्थमनी ज्योत पेटली हो, म्हणून तर आण्णांनी मला बोलवले आहे.

          भटूने आपल्या कपाळावर हात ठेवत दोन्ही हाताने आपले डोके गच्च दाबले होते. मनू त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष देत होती.ती पुढे आली आणी भटूला आपूलकीने म्हणाली, भटू डोके दुखतय काय जवळ येत तीने भटूच्या डोक्याला हात लावून दाबू लागली तो थोडा ओसाडला अंग थोडे थरथरुन आले आणी नको नको म्हणत तो तिला विरोध करु लागला पण मनू कुठे त्यांचे ऐकणार होती तिला तर भटूच्या रुह्यात शिरायचे होते आणी भटूला कसे ही करुन आपल्या परीने जवळ करायचे होते .भटू बसल्या जागेवरुन अंगात विज चमकावी तसे त्याचे शरीर सळसळून आले होते म्हणून तो बाजूला झाला होता. त्यांच्याकडे बघत मनू म्हणाली, भटू माझा स्पर्श ही तूला नको झाला त्याचा नाईलाज झाला होता त्याला आता त्याच्या योगीची हाताची सवय झाली होती. त्यांचे शरीरही मनूला नकार देत होते .तो म्हणाला तसे नाही मनू उगाच कशाला घराले लोक काय म्हणतील.मनू मनोमन गालातल्या गालात हसली कशी वेळ आली माझ्यावर किती प्रेम करायचा भटू माझ्यावर मला कधी डोळ्याआळ केले नाही आणी आज माझाच स्पर्श त्याला नकोसा झालाय काय लिहून ठेवले संटवीने माझ्या नशीबी काय माहीती आजू काय काय येणार माझ्या वाट्याला काय माहीती.   

दामू आण्णा आले होते भटून उठून थोडा वाकून दामू आण्णांच्या पायाला हात लावून नमस्कार केला दामू आण्णाने त्याला आशिर्वाद दिला आणी ते बाजूला खुर्चीवर बसले. तेवढ्यात सरीताबाई आल्या घरातील सर्वच माणूसे भटू घरी येणार म्हणून घरीच होते प्रकाश दादा तर केव्हाचा काहीच बोलेले नाही तो फक्त मनूचे भाव टिपत होता मनूची अवस्था एखाद्या गरीब गाई सारखी त्याला वाटत होती. बहीण कशी भटूसाठी वेळीपिसी झाली आहे ते त्याला जाणवत होते पण तो भटूला माझ्या बहीणीला तू घेवून जा म्हणून सांगू शकत नव्हता कारण त्याने कित्येक वेळा भटूला जम्मूत आल्याचे बघीतले होते. भटू मनूकडे किती याचना करायचा सोबत घेऊन जाण्यासाठी तेव्हा मनूने भटूला काहीही कारण सांगून परत पाठविले होते म्हणून तो काहीच बोलत नव्होता त्यांच्या कडे फक्त बघत राण्यांचे काम होते.

       दामू आण्णा भटूला म्हणाले, भटू मी असे ऐकले की,तू लग्न केले म्हणे,हे खरे आहे. 

       रघूने नुसते हुम केले.

       दामू आण्णा म्हणाले,का बेटा,तूझे मनू सोबत लग्न झाले होते ना ? मग तरी ही तू लग्न केलस का ?

       भटू म्हणाला,आण्णा विचारा तूम्ही टिनूला 

       दामू आण्णा थोडे कावरे बावरे होत भटूकडे बघत म्हणाले, मनूला का विचारु लग्नतर तू केलंस ना ?

       भटू म्हणाला , हो , आण्णा लग्न मीच केले पण ते तिच्या मर्जीने माझ्या मर्जीने नवे, 

      दामू आण्णा म्हणाले, काय तिच्या मर्जिने म्हणजे काय !

       प्रकाश दादाकडून राहीले गेले नाही ते म्हणाले, आण्णा आपलेच नाने खोटे तर आपण काय बोलणार .

       दामू आण्णा म्हणाले म्हणजे.

       सताबाई म्हणाल्या,आण्णा भटूची काहीच चूकी नाही तो तर थांबला होता बिचारा तब्बल बारा वर्ष म्हणजे आण्णा पुर्ण एक तप आपलाच सिक्का खोटा दोष कुणाला देणार ते भटूला नाही मुळीच नाही .

       दामू आण्णा म्हणाले, आ रे ! थांबा काय लावले तुम्ही दोघ्या आई लेकाने जरा मला कळेल असे बोला.

       प्रकाश दादा मनूकडे बघत दामू आण्णाना म्हणाले आपल्याच लेकीने भटूला लग्न करायला भाग पाडले .

       दामू आण्णा आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले, हे काय आता नविन, कोणती बायको, आपल्या नव-याला सागेन की, तुम्ही विवाह करुन घ्या म्हणून.

        आता कुठे दामू आण्णाच्या लक्षात खरे कारण आले होते.ते फक्त एक टक मनूकडे बघत राहीले. आणी म्हणाले कठीण आहे बुवा हा वाद सुलजावणे ते किती तरी वेळ तसेच डोक्याला हात लावून बसले होते केव्हाशी सरीताबाई कडे बघत म्हणाले, वहीणी काय करावे आपण कसे समजवू भटूला मी की, तू माझ्या मुलीला सोबत ठेव म्हणून. बोला वहीणी बोला ! 

सरीताबाई म्हणाल्या, आण्णा काय बोलू, बोलण्यासारखे ठेवलय काय, तर आपण बोलणार.  

      घरातली चर्चा मनूच्या विरुद्ध होत होती ती बेचैन झाली भटूला कशा करीता येथे बोलवले ते सोडून माझी आई अंश:शा भटूची बाजूंनी होतांना दिसत आहेत असे तिच्या लक्षात आले गालातल्या गालात हसत ती आपल्या नशिबाला दोष देवू लागली होती तीने दामू आण्णा कडे बघीतले तिच्या लक्षात आले की,जेव्हा मी रघूसोबत जात होते तेव्हा ह्यच आण्णानी मला समज घातली होती आणी मला शब्द सुद्धा दिला होता मग कुठे गेले त्यांचे शब्द ! कुठे गेली त्यांची आन ?ति मनातल्या मनात दामू आण्णाचा राग राग करत होते.

       भटू गप्प गरीब गायी सारखा बसला होता त्याने मनात ठरवले होते की, मी फक्त ऐकून घेणार आहे म्हणून तो तसाच ठरविले प्रमाणे वागत होता.आज काहीही होवो तो ठासून सागणार होता की,मी मनूला माझ्या सोबत नेणार नाही. ठेवणार नाही.मी तिला नादवू शकत नाही.आखे आयुष्य त्याने जीच्यासाठी वाया घातले ति आज सोबत राहण्यासाठी जिवाची आटापिटा करत होते.मग त्याने कुठे चुकीची केली होती तो तर तिला घेण्यासाठी जीवाचे रान करून तो अक्षरशा वैतागला होता तरी ती आली नव्हती.

                                  भटू हरचंद जगदेव जापीकर..

0 Comments: