कथा : गाठोडे

कथा : गाठोडे

 कथा : गाठोडे भाग 23 वा 




         मी घरी येवून पोहोचतो कधी नव्हे आज आपल्या बायकोला जवळ घेत म्हणालो,योगी,जेवलीस का ? बायकोने, माझ्याकडे बघीतले आणी म्हणाली, हो,कधीच तुमची वाट बघत बसले होते. पण तुमचा फोन ही नाही आणी तुम्ही ही नाही. मग ठरवले आपण जेवण करुन मोकडे व्हावे तुम्ही येवढ्या लवकर याल याची खात्री नव्हती म्हणून मी जेवले. तुम्हाला ताट लावते. थोडे बाळ रडते त्याला घेते. मग आणते जेवायला. मी नको नको म्हणत राहु दे ! मघाशी नास्ता केला मी. मुलाचे बघ, नाही मीच घेतो त्याला असे म्हणत मी बाळाला दोघी हाताने वर उचलले आणी त्याचा पापा घेत प्रवासातले शिन विसरलो होतो. योगीने तरी माझ्या जेवणाचे ताट लावले होते. बाळाला आपल्याकडे घेत म्हणाली, तुम्ही तुमचे आवरुन घ्या तोवर मी माझ्या राजाला सांभाळते. मीने सर्व सोपस्कार पार पाडून जेवण्याकरीता बसलो बायकोने चांगलाच जेवणाचा बेत केला होतो आज माझ्या आवडीची डिस होती बायकोने मला आवडणा-या मछीचे कालवण केले होते. त्याच बरोबर मला आवडणारे मादीली तळली होती.जेवताना मी बायकोला अग्रह करत होता पण तीने मला नकार दिला अशा अवेळी जेवणे तिच्या लाहणग्या बाळासाठी घातक ठरले असते म्हणून ती आपल्या माडीवर बाळाला घेऊन त्याला स्थनपाण करत होती आणी बाळ ही चुटूचूटू आवाज करत आईचे दुध पिण्यात गुंग होता.

         मी बाहेर मनू सोबत नास्ता करुन देखील घरी आपल्या बायकोच्या आग्रहाखातर मनसोक्त पोटभरुन जेवत होतो. त्यावरुन बायकोने अंदाज बांधला की, हे कुठे जवलेले दिसत नाहीत मनोमन म्हणाली, पण माणूस त्या गुरासारखा असतो परतनभर शेत चरुन देखील तो नव्याने चरत असतो. मी ही तसाच त्या गुरा सारखा होतो खावून पेवून आपल्या बायकोच्या आग्रहाखातर मनसोक्तपणे जेवणाचा आनंद उपभोगत होतो. उशिर झाला तरी मला बायकोने काही विचारले नाही सुट्टी असली तर ती हमखास म्हणायची आज तर सुट्टी आहे कुठे निघालात आपण पण तिला माहीत असायचे की, मी कुठेही पुर्ण दिवस घराबाहेर राहीलो तर नचूकता रात्रीच्या कुठे न थांबता कितीही रात्र झाली तरी परत येत असे म्हणून ती माझी जास्त काळजी करत नसायची आणी जास्तीच्या नुसत्याच उठा ठेवी करत नसायची. माझ्या आंतरिक मनात जरी मनू लपून बसली असेल पण मीने आज पर्यंत कधीच तिचा उल्लेख योगी पुढे केला नव्हता. मात्र आज माझे जेवण वगैरे झाले आणी योगी हळूच आवाजात म्हणाली, कुठे काही तर आपले बाहेर आहे का ? मी तिच्या बोलण्याने तिचे मुखमंडल न्याहाळू लागला होतो. ती ही माझ्याकडून उत्तराची असं लावून बसले होती.

         मी म्हणालो, योगी हा काय तुझा प्रशन कधी नवे, आज असे काय विचारते तुला काही माझ्या वागण्यात फरक जाणवले, भासले का ? 

         ति म्हणाली, तसे नवे,सहज मनात आले म्हणून विचारपुस केली येवढेच, ते दोघेही हसले पण माझे धाबे धनादले होते. मला वाटू लागले होते की, माझे मागचे कर्माचे बिब फुटते की,काय मी सावध झालो होतो हळूहळू माझी योगी मला असे अनेक प्रश्न निर्माण करणार होती माझ्या ध्यानात आले होते. तरी म्हणतात ना जित्याची खोड मेलेल्या वाचून जात नाही. माझे जेवण झाले आणी मी  आपल्या बाळाला घेवून पलंगावर पडलो होतो बाळ माझ्याशी चांगले हीत गुंज करत होते. मनातल्या मनात म्हणालो यो बापाच्या वडणार जावू नको म्हणजे झाले. तोवर योगीने आपले कामे आवर सावर करत होती .  

        माझ्या कानात एकच आवाज घूमत होता तुमचे बाहेर काही लफडे वगैरे नाहीना ? कितेक वेळा मला ह्या शब्दाची आठवण होत होती. झोपतही मी दचकुन उठलो कितेक वेळ बेडवर तसाच पडून राहीलो पण तिचा प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता. माझे आवसान बिघडले होते काही करुन ह्या माझ्या भुतकाळाच्या गर्भात वाढलेल्या गोष्टींचा उहापोह होयायला नको असेच मी मनोमन म्हणत होतो. मात्र हे वादळ असे सहजा जहजी थांबणारे नव्हते. पण तरी मी त्यास दुर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. माणूस बदलत असतो आणी त्यातून बरेच काही शिकत असतो त्यातून प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असतो मी विचार करु लागलो आज असे कसे ईच्या मनाल आले असणार का मग पुढे भविष्यात उध्दभवणा-या वादळाचे संकट आहे असे मला मनोमन वाटत होते तेवढ्यात माझ्या लक्षात भूतकाळात एक घटना घडलेली आठवली.

         माझी बायको माहेरी गेली होती तेव्हा मी एकटाच खोलीवर राहातं होतो तेव्हा माझ्या घरी माझा मित्र पंडित कढरे सर पाहुणा म्हणून आले होते तेव्हा म्हणून मीने स्वयंपाक करण्या कामी शेजारच्या घरात राहत असलेल्या एका माझ्या ओळखीचे सद्दगृहस्ताने ते बघीतले आणी म्हणाले, कुणी पाहुणे आले आहेत का ? मग त्याच्यासाठी जेवणाचा बेत चालू आहे ते म्हणाले, तुमचे मित्र ब-याच वर्षाने आले आहेत तर तुम्ही गप्पा मारा तसा आमचा स्वयंपाक झाला आहे तर मी माझ्या बायकोला तुमचा स्वयंपाक करायला सांगतो ती लगेच करुन देईल मी थोड्या ओसाडलो मनातल्या मनात विचार करत मी कधीसी तयार झाला होतो मग त्या सद्दगृहस्ताच्या बायकोन पटकण स्वयंपाक करुन दिला हे चाळीतल्या ब-याच जणींनी बघितले होते म्हणून जेव्हा योगी माहेरहुन परत आली तेव्हा ज्यांनी ज्यांनी जे बघितले होते त्या बायकांनी तिला गाठून तिखट मीठ लावून बरेच स्वादीष्ट बणवून निर निराळ्या गोष्टी सागून तिच्या मनात बरेश भरवले तिच्या मनात दाट शंका निर्माण झाली होती तिने आपल्या नव-याला कानोकान खबर नकरत ति त्याच्यावर बारीक नजर ठेवू लागली होती मात्र ती नेहमीच मनातल्या मनात कुढत राहीली होती मी गावाला जाते तर माझा नवरा असा गैर फायदा घेत असतो तिचे मन तिला नव-याने घृणास्पद कृत्य केले असणार असे अनेक वेळा प्रश्न पडत होते पण तिने आपल्या नव-याला आज पर्यंत त्या बयाशी, तिच्याशी बोलताना ही बघीतले नव्हते. मग इतर ज्या बायका म्हणतायत तर ते खोटे बोलतील का ? आणी का खोटे बोलतील असे तिच्या मनात दाट शंका निर्माण होत असे 

         एके दिवशी योगीचे अंग तापाने कनकन करत होते मी जेवण करून नेहमी प्रमाणे कामावर निघालो होतो कामावर जाताना आपल्या बायकोला म्हणालो की, आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो तर बरे होईल तुला ही बरे वाटेल पण तिने कानाडोळा केला आणी म्हणाली, तुम्ही कामावर जावून या मग संध्याकाळी बघू काय करायचे ते म्हणून मी घरातून निघालो घराच्या थोडा पुढे गेल्यावर मला काही तरी घरी राहील्याचे जाणवले आणी मी माघारी फिरला घरात बघतो तर काय शेजारीन बाई येवून बसली होती. तिने मला बघीतले आणी तिच्या घरी निघून गेली माझ्या मनात काही काळे गोरे नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले योगी मी येतो ग म्हणून निघून गेलो.कामावर निघून गेलो.

         बायकोचे बारीक लक्ष माझेवर होते पण मी माझ्या        मनात अशा फालतु कामा करीता वेळ कुठे होता मी तर आपले पोट कसे भरेल आपली प्रगती कशी करावी जास्त मेहनत करुन  पुढे जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो मग नुसत्या उठाठेवी करुन काय उपयोग होता मात्र माझ्या बायकोच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आजूबाजूच्या बायकांनी शंकांचे पाहाळ उभा केल्यामुळे ति तळमळली होती माझा नवरा खरच असे कृत्य करत असेल का अनेक प्रश्न मन उपस्थित करत होते पण खरे काय आणी खोटे काय याची कल्पना तिलाही नव्हती. पण डोळ्यांनी पाहीले तर ते सहन करतो माणूस पण कुणी सांगीतले तर ते सहन होत नाही.

         असे तिचे वागणे चालू झाले होते मीने नुसते दुस-या स्त्रीकडे या कुठल्या मुलीकडे ही बघीतले तर ती माझी जोडी त्यांच्याशी लावत असे मीही एकदम बायकोत असा कसा बदल झाला तर मला ही कळले नाही पण मी या गोष्टीने पुर्णत:ह निराश झाला होतो आता काय करावे कसे तिला समजून सांगावे हा मोठा पेच निर्माण झाला होता जिवनात हताश होऊन दुसऱ्या दा हरल्याचे मला जाणीव झाली होती.माझ्या सुखी संसारात एक नविन वादळ निर्माण झाले होते मीने तिला खुप समजवण्याचा प्रयास केला पण योगी मानायला तयार नव्हती. संसारत रोजच भनभन नको म्हणून मी ते मुकाट्याने सहन करत राहीलो होतो. माझे असे झाले की, "असा चाले जगाचा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ,  

         मला असे वाटू लागले की,माझे पापाचे घडा आता ख-या अर्थाने भरला होता मी भुतकाळात काय चाळे केले होते ते आता माझ्या वाट्याला येवू लागले होते चक्क मी हे आच्यानक नकळत उध्दभवलेल्या वादळ्यात भरडू लागलो होतो पण मीने कुठे असे वावगे केले होते मी तर प्रेम करुन विवाह केला होता त्यामुळे मी जातिवादीचा शिकार होऊन ख-या अर्थाने माणूस बनत होतो इतके वर्ष थांबून देखील आपल्या बायकोसाठी तिच्या प्रेमासाठी जागत आलो होतो आणी आज ते ख-या अर्थाने नवरा बायकोच्या मधे संसारीक जिवनात वादळ निर्माण होत चाललं होते.त्यातून सुटणे अवघड होते.

         माझे लग्न झाल्या दिवसापासून मी पुर्णतः बदललो मी नेहमीच आपल्या कामात काम ठेवून तो सरळ मार्गी चालत राहीलो. मी लग्न करुन माझ्या जीवनाचे सोने केले होते कारण माझ्या प्रेमाची बायको करीता पुर्ण एक तप वाया घातले होते जेव्हा मनूने त्याला लग्न करुन हे असा आग्रह केला तेव्हा मला काही काळ वाटले आपण जिच्यासाठी येवढे वर्ष वाया घातले तिला कशाला आतंर द्यावे म्हणून मन माझे कुढत होते मात्र माझ्या एक मनाने तिच्या अशा आग्रहाने प्रफुल्लित झाले होते मनात नविन उर्मि जागृत झाल्या होत्या जीवनात जो शन वाया गेला त्या शनाची भरपाई मला करुन घेयायची होती म्हणून मनूची परवानगीने माझ्या मुखमंडलावर तेजी निर्माण झाली होती मला इतका आनंद झाला होता की मला व्यक्त करता येत नव्हाता. म्हणून माझ्या आई वडीलांना सांगितले की, तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघा माझा असा निरोपने घरच्यांचा आनंद दुगुणीत झाला ते ही माझ्या मागे लवकर लग्न कर म्हणून अनेक वर्षांपासून लागले होते पण मुलाने त्यांना आता करतो नंतर करतो असे कारण सांगून बरेच वर्ष निघून गेले होते माझ्या गावाकडे तर माझ्या विषयी ब-याच अफवांचे पिके आली होती कुणी काय काय मिटमिरची लावून माझा जिवनपट उभा करत होते तर कुणी म्हणत होते त्याचे कपडेच घरी येतील चमत्कारिक तित्या बरेच नानात्तरेच्या खोट्या नाट्या गोष्टी रंगून ऐकून माझे आई-वडीलही भ्रमित होत होते.

         आई बाबांनी सांगितले की भटू मुली बघायचे काम तुलाच करायचे आहे तर तुला त्याच्या करीता वेळ काळावा लागेल मी ही लग्नाचे मनावर घेतले होते जेणेकरून मला आता आपल्या लग्नाच्या पुढाकार घेऊन मुलगीचे जेथे निरोप असेल तेथे जावून  मुलगी बघू लागलो ऐके दिवशी माझ्याच जवळच्या नातेवाईकांनी मला मुलगी दाखवली सर्व काही सुरळीत ठरले गेले पण त्याच महाशयांनी माझी बदनामी करुन ते जमलेले लग्न मोडले पण ज्या मुलीशी माझे लग्न संबंधांच्या गोष्टी झाल्या होत्या तीच मुलगी एकदम असे कसे झाले मुलगा तर चांगला आहे त्याची समाजात जनमानसात ठसा उमटवला आहे तो असा कसा असेल म्हणून ती मुलगी मला भेटायला आली व सारी हकीकत ऐकून ति तळमळली ती स्वत:शी म्हणाली आपण कुणाचे ऐकाला नको होते चांगला मुलगा हातातून गेल्याची खंत व्यक्त करुन गेली.मी मनोमन समजला होतो काय कोन कुणाचे होत नाही म्हणून मीने अगदी मी ज्यांच्यावर प्रेम करत होता त्यांना सोबत घेवून मुलीचे निरोप जेथे असेल तेथे ते जावू लागले होते पण मला बायको म्हणजे मुलगी बघण्यात जास्त वेळ गेलाच नाही अगदी माझ्या जवळच्या नात्यातली मुलगीची निरोप मिळाला आणि ती मुलगी बघून होकार भरला  

         लग्न म्हटले तर एक थाट असतो पण मला वाटले आपले लग्न एकदम साध्या पध्दतीने व्हावे आणि हिन्दु धर्माच्या समाजात चालत असलेल्या रुढी परंपरा सर्व कसे बाजूला सारुन करावे असाच माझा एकदरीत कैयास होतो जरी या गोष्टी नाकारल्या असल्या तरी माझ्या घरातील लोक कुठे या गोष्टी नाकारणार होते माझी आईने तर गावातल्या पंचभाई ब्राम्हणा कडून खडानिखडा माहीती घेऊन कुठले व्यतेय लग्नात येत तर नाहीना याची साहानिशा करत आल्या होत्या हे मात्र मला कानोकान खबर नव्हती. आई आपल्या मुलाच्या लग्नात कुठे विघण नको म्हणून करत होती पण या गोष्टी घडायला नको म्हणून भटू म्हजेच मी काळजी घेत होता.

         लग्न म्हटले तर तेथे हलदी अंगाला लावणे येतेच आणी मग मी आपल्या परीने सा-या प्रथा बाजूला सायचा  प्रयत्न करत होता मग माशी कुठे शिकत होती भटूने आपले घरातल्या व्यक्तीना हलदी वगैरे कार्यक्रम होणार नाही आणी मी अंगाला हलदी फासणार नाही येवढे बजावून सुध्दा सांच्याला घराच्या आवारात वाजंत्री वाल्याचा गोधळ बघून आवक झालो हलदीची संपुर्ण तयारी झाली होती पण ज्याला हलदी लावणार त्याचा तपास नव्हता. जो तो भटूला गैवसू लागला पण भटूने दुरुन तमाशा बघणे पसंत केले होते जेणे करुन तेथल्या बायांच्या हाताला न लागावे म्हणून.

         जमलेले जुने जाणते आप आपले परिने मला टोचून  शिव्या शाफ देवून बोलू लागले होते. पण काही लोक तो बरोबर आहे असे सांगत होते ब्राम्हणांनी हळदीचा जो मुर्त सांगितला होता तो समाप्त झाला होता.मग मी हळूच रमत गंमत जसे राजाला दिवाळी माहीती नाही असा आलो होतो. आईने मला बघताच पकडले आणी ज्या मनात येतील त्या शिव्या हसळल्या होत्या पार सात पिडी झमन मधी जातील याची जाणीव करुन दिली मी आईच्या जवळ जात आईच्या लाडाने गालगुचा घेत म्हणाला,आई असं नसते मला सांग मी हळदी न लावल्याने काही बिघडणार आहे, नाही ना उलट माझे सात पिढीतले पित्तरे सुखावली असतील आईने नैराश्य पुर्ण आपली माण हलवून म्हणाली," तु भट्या, सुधरणार नहीं तुले जे करान से तेच तु करस  काहीच कामना नही बा ? असे म्हणत ताटातुन थोडी हळद घेत माझ्या गालावर लेप देत म्हणाली, तुन राहूदे ! माले मन्हा लेकले हलदीने पिवळे व्हायल बघाण से. भटूने आपल्या आईच्या समाधाना साठी आपला उजवा हाताची करकडी पुढे करत म्हणाला, या बोटाला हदली लाव म्हणजे तुझा लेक पिवळा होईल आईचे डोळे पाणावले होते ती त्याच्या करगडीला हलदीचा लेप चळवत येवढे म्हणाली, आयुष्यभर समाजन हितनसाठे परिवर्तन वादी राहय म्हणजे हि माय जिकले.

                                      भटू हरचंद जगदेव जापीकर...

1 comment