राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरलीधर घन:शाम सावंत ( ओरस ) यांचे अल्पशा आजाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरलीधर घन:शाम सावंत ( ओरस ) यांचे अल्पशा आजाराने निधन

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कांदिवली -विरार झोनचे अध्यक्ष मुरलीधर घन:शाम सावंत ( ओरस ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .




कनेडी ( वार्ताहर ) : आवळेगाव खालची वाडी येथील रहिवासी तथा मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस कांदिवली -विरार झोनचे अध्यक्ष  तसेच नरवणे हायस्कुल कांदिवलीचे माजी उपमुख्याध्यापक कै.मुरलीधर घन:शाम सावंत ( ७० ) यांचे मंगळवार दि . १५ रोजी ओरस येथील बंगल्यावर अल्पशा आजाराने निधन झाले. 
        स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातुन शिक्षण मिळावे ,शहरी  विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थ्यांना सहभाग प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने पतिपत्नी यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून खर्च करत श्री  सखाराम सावंत एज्यूकेशन ट्रस्ट ची स्थापना केली .त्यानंतर जयवंत सावंत इंग्लिश स्कुल ,आवळेगाव ची निर्मिती केली . गेली तीस वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय रहात निस्वार्थी पणे काम करत होते .कांदिवली चारकोप येथे ते रहात होते .लॉकडाऊन मध्ये ते सहा महिन्या पूर्वी गावी आले होते .मुळगाव आवळेगाव येते सणानिमित्त जात असत एरवी ते ओरस येथील आपल्या बंगल्यात रहात होते .कांदिवली परिसरात ते सावंत सर म्हणून परिचित होते .सध्या ते गोरेगाव येथील पांडुरंग हायस्कुलचे ट्रस्टि म्हणून कार्यरत होते. सुरवातीच्या काळात दै .मराठा  मध्ये प्रुफरिडरचे काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले .दहा वर्षा पूर्वी त्यांनी उपमुख्याध्यापक पदावरून स्वेछ्या  निवृत्ती घेतली होती. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ते कांदिवली येथे कार्यरत होते. उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून ते कलाश्रुष्ठी मध्ये प्रसिद्ध होते .मास्टर ऑफ आर्टचा डिप्लोमा त्यांनी करत आपली कारकीर्द घडवली .समाज कार्यात त्यांना आवड असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना विविध प्रश्न ,समश्या मार्गी  लावल्या .समाज कार्यात आवड असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय होत विविध उपक्रमाच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास केला .सामाजिक कार्याप्रति असलेली त्यांची तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  कांदिवली-विरार झोनचे अध्यक्ष पद बहाल केले .पदाला प्रामाणिक पणे न्याय देत त्यांनी सामाजिक ,शैक्षणिक असे अनेक प्रश्न मार्गी लावले होते.आपल्या सुस्वभावी ,मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात परिचीत होते . त्यांच्या पश्चात पत्नी ,पुतणे असा परिवार आहे .सेंट्रल ब्यांकेच्या  ऑल इंडिया युनियनचे लीडर  कै .जयवंत सावंत यांचे ते धाकटे बंधू तसेच पत्रकार मिलिंद डोंगरे ( सावंत ) यांचे ते मामा होते .त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

0 Comments: