तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

   तो आणि ती 


तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

भाग- ११

लेखन- अविनाश पाटील

संपर्क- ८०८०१७१४३०


दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे

किती आवरावे आपणच आपणाला; कठीण होत आहे


नारायण सुर्वे यांच्या ह्या ओळी त्यांना दोघांना लागु होत असतील का? पहिल्याच भेटीतील परिस्थिती अगदी भीषण होती त्याला भेटण्याची तिच्या मनात असलेली ओढ आणि त्यांचा मागमुसही लागत नाही अशा कचाट्यात मी सापडलो होतो. 


मी एकटीच माझी असते कधीकधी

गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी


येथे न ओळखीचे कोणीच राहीले

होतात भास मजला नुसते कधीकधी


जपते मनात माझा एकेक हुंदका

लपवीत आसवे मी हसते कधीकधी


मागे मी कधीची हरपुन बैसले

आता नकोनकोशी दिसते कधीकधी


जखमा बुजून गेल्या सार्‍या  जुन्या तरी

उसवीत जीवनाला बसते कधीकधी


सुरेश भटांच्या या ओळी अगदी समर्पकपणे तिला लागु होतात हे मला जाणवले. तो मात्र कुठेच नाही अगदी मलाही दिसत भेटतं नाही मनात शंकांचं काहुर माजल होतं नकळत वाईट विचार मनात येत होते. तिने त्याला शोधण्यासाठी घेतलेला पुढाकार नक्कीच आशावादी होता मात्र वेळ निघुन तर गेली नाही ना ही शंका वारंवार मला अस्वस्थ करत होती. त्याला शोधण्याची एक नवी प्रेरणा मला मिळाली होती शिवाय यावेळीं ती देखील सोबतीला होती. आश्चर्य वाटावं ते म्हणजे तो असा गायब झाला होता की कोणालाच थांगपत्ता नाही काहीही असो त्यांच्या परतीच्या प्रार्थनेत मला धन्यता दिसत होती. मावळलेला सुर्य नक्की उगवणार हे मला त्यांच्याबाबतीत देखील वाटतं होतं आणि प्रयत्न सुरू झाले. जाने क्या ढुंडता हैं ये मेरा दिल मुझको क्या चाहिये जिंदगी? त्याला शोधण्याचा प्रवास तिच्या समवेत पुन्हा सुरू झाला त्याला आवडणाऱ्या सर्व जागा, मित्र मंडळी जगाला माहीत नसलेल्या त्याच्या अनेक गोष्टी मला या दरम्यान तिच्याकडून कळत गेल्या. त्याचबरोबर तिच्या मनातला तो कसा होता हे देखील मला चांगलंच कळलं. ह्या टप्यात दोन तीन महिने पालटले अगदी झपाटल्यासारखे आम्ही दोघं त्याचा शोध घेत होतो रोज हाती लागत होती फक्तं निराशा आणि निराशाच...


0 Comments: