कल्याण डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयांच्या लुटमारीवर अशी लुटूपुटूची कारवाई नको....
आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भरारी पथकाने रुग्णांची लूट करून भरमसाठ बिल आकारणी करणार्या २२ खाजगी रुग्णालयांकडून उपचार बिलांवमध्ये जास्त आकारलेले फक्त ३४ लाख रूपये रूग्णांना परत केले, ह्याचाच अर्थ मनसेने केलेले आरोप हे सिद्ध झालेच पण आमचे असे म्हणणे आहे कि ३४ लाख हे फारच कमी आहेत काही खाजगी रुग्णालये तर इतकी लुटतात की हा आकडा २ ते चार कोटींच्या घरात गेला पाहिजे...
आता तर कोणी हि उठते व कोविड हॉस्पिटल सुरु करते अश्या हॉस्पिटलमधे कंपाऊंडर किवा तत्सम दर्जाचे कर्मचारी डॉक्टर म्हणून काम करताना दिसून आलेले आहे, त्यामूळे चांगले रुग्ण बरे होण्या ऐवजी मरणाच्या दारात ओढवले गेल्याच्या अनेक तक्रारी मनसे कडे प्राप्त झाल्या आहेत, लवकरच अश्या खोट्या रुग्णालयांना जनतेसमोर नागडे करूच पण महापालिकेने स्वतःच्या भरारी पथकाला अधिक सक्षम करून कारवाईत वाढ करावी, अशी ३५ लाखांची शुल्लक वसूली न करता सरसकट सर्व रुग्णालयांच्या रुग्ण बिलांचे सरकारी नियमानुसार लेख परीक्षण अगदी काटेकोरपणे करावे, अश्या शुल्लक वसुली वरून ते होत नसल्याचे संशयास्पद म्हणजेच खाजगी रुग्णालयाच्या बाजूने केल्याचे वाटते, अशी दाखविण्या पूर्ती कारवाई महापालिकेने कृपया करू नये, जेणे करून अश्या लुटारू रुग्णालयांकडून फसवला गेलेला रुग्ण आपल्यावर विश्वास न दाखवता आमच्या सारख्या राजकीय पक्षांकडे मदतीला येईल, तरी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आपले भरारी पथकांची भरारी जरा अजून कार्यक्षम करावी, तक्रारी नंतर कारवाई पेक्षा आधीचीच कारवाई करावी... कल्याणचे साई लीला, साई डोंबिवलीचे स्वामी समर्थ व इतर हि काही उदाहरणे आहेत तसेच महापालिकेच्या कोविड केंद्रांवर सुद्धा सक्षम वैद्यकीय अधिकारी दिसून येत नाही उदा डोंबिवली जिमखाना येथील कोविड डायलेसिस बेड.....
मनसे सदैव जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतच राहील व त्यांना योग्य न्याय मिळवून देणार
नागरिकांना विनंती कि अन्याय विरोधात आवाज उठाव तुम्हाला घरी येऊन कोणी मदत करेल ह्या भ्रमात राहू नका तुम्हाला जर खाजगी रुग्णालयाकडून त्रास झाला असेल, भरमसाठ बिल लावून लुटले असेल तर त्या विरोधात आधी तुम्ही तक्रार करून आवाज अथवा व अश्या काही लुटारू वृत्तीला आळा घाला....
राजेश कदम..........





0 Comments: