जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा  कार्यक्रम

जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम

जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम



डोंबिवली : ( शंकर जाधव ) येथील प्रभाग क्र.५४ ठाकुरवाडी जुनी डोंबिवली येथे भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली (पश्चिम) मंडळाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित `सेवा सप्ताह` आयोजित केला होता. आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ (अध्यक्ष) प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात सर्व डोंबिवली पश्चिम मंडळ कार्यकारणी, अध्यक्ष प्रदीप चौधरी, उपाध्यक्ष दिलीप धुरी ,मंडल सचिव अर्चना पावडे, प्रशांत पाटेकर, मनिष शिंदे, राजेश म्हात्रे, सोशलमिडीया प्रमुख, हर्षद सुर्वे, महिला आघाडीच्या रिशिता राऊत, देविक्रिशनंन, ऐश्वर्या शिर्सेकर, शोभा सावंत, मृणाली जोशी, रिक्षा युनियनचे कोचरेकर, मॅक्सी शिरोडकर, उद्योजक नंदु कोल्हापूरे, गणेश निंबाळकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच युवा कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली.

0 Comments: