कविता :  चल आई बुद्ध विहारी

कविता : चल आई बुद्ध विहारी

 कविता : चल आई बुद्ध विहारी


नको ना जाऊ आई भक्तांच्या दारी 
आता तरी चल बुद्ध विहारी ||धृ||
मांत्रीक मना मध्ये नको ती भीती घालतील 
बुद्धाच्या मार्गाने निब्बाणाला प्राप्त होशिल
धम्मा च्या मार्गाने येईल नवी उभारी ||१||
नवस तापास करून तुला काय गं मिळाल 
कर्ज बाजारी होऊन तू ते नवस ही फेडलं 
तरी ही नाही सुटली तुझी समस्या सारी ||२||
बुद्ध विहारी जाऊ आणि बुद्ध वंदना घेऊ 
शरण जाऊ त्रिशरणा पंचशीलाचे पालन करू 
मंगल ती बुद्ध वाणी नरेश मंगल ती मैत्री ||३||
   - कवि नरेश गंगाराम जाधव भिवंडी

मो.७५१७३८९७४७

0 Comments: