पालिका आयुक्तांवरून कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापले..
शिवसेना पाठीशी तर भाजप-मनसेची बदलीची मागणी
डोंबिवली : ( प्रतिनिधी ) कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजारांपुढे झाली आहे.पालिका यंत्रणा दिवसरात्र काम करत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे खापड भाजप आणि मनसेने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर फोडले.तर पालिका आयुक्तांचे काम उत्तम असून कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याकडे आयुक्तांचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगत शिवसेनेने मात्र आयुक्तांची पाठराखण केली.दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत पार पडलेल्या कोरोना परिषदेत भाजप आणि मनसे आमदारांनी आयुक्त बदलीवर भर दिला.मात्र कोरोना निमंत्रकांनी आयुक्त बदलीचा कोणताही ठराव परिषदेत झालाच नसल्याचे स्पष्ट केले. एकूण काय तर अश्या परिस्थितीतही पालिका आयुक्तांवरून कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापल्याचे दिसते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या १६ लाखापेक्षा जास्त आहे.आतापर्यत पालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजाराच्या वर गेली आहे. या परिस्थितीवरून कोविड रुग्णालयाची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.तर प्रत्येक प्रभागात नागरिकांची मोफत कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे.मात्र पालिका यंत्रणा कमी पडत असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी परिषदेत करत आयुक्त बदलीची मागणी केली. परंतु शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी मात्र आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांची बदली या यावर मार्ग नसून प्रशासन दिवसरात्र काम करत असून आरोग्य यंत्रणा कमी पडत नसल्याचे सांगितले. भाजप व मनसे यांनी अश्या परिस्थितीत राजकारण आणणे योग्य नसल्याचे सांगत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी आणि विविध सामाजिक संस्थेकडून सूचना मागण्यासाठी कोरोना परिषद भरवली होती. मग पालिका आयुक्त बदलीवर चर्चा हे कोरोना परिषदेत राजकारण असल्याचा आरोप मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.तर कोरोना निमंत्रक कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी परिषदेत आयुक्त हटाव चा कोणताही ठराव झाला नसल्याचे सांगितले.
यावरून परिस्थिती कुठलीही असली तरी कल्याण-डोंबिवलीत राजकारण पेटते हे दिसते.यावेळी मात्र थेट आयुक्त बदलीची मागणी केल्याने कोरोना नियंत्रणात येईल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.प्रशासनाने आणखी जोमाने काम करणे आणि नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे हे महत्वाचे झाले आहे. कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासनाला साथ देणे गरजेचे आहे अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. याउलट भाजप आणि मनसेने आयुक्त बदलीवर जोर दिला.यात सामाजिक संस्थांची भूमिका राजकारणात न पडता यावर ठोस पाउले कशी उचलता येईल यावर सूचना दिल्या.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आयुक्त बाबत अद्याप स्पष्ट झाली नाही.इतर राजकीय पक्षांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असलीअसून अप्रत्यक्षपणे आयुक्तांकडे बोट दाखवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुक्त बदलीची मागणी योग्य होती का शिवसेना आयुक्तांची पाठराखण नागरिकांसाठी योग्य होती हे लवकरच दिसेल. तर कोरोनां परिषद हे माध्यम हे या परिस्थितीवर बदल घडवील का हे पुढील कोरोना परिषदेच्या चर्चेत दिसून येईल.




0 Comments: