कविता :- ।। एका विषाणूची किमया ।। (दिपाली साळवी)
।। एका विषाणूची किमया ।।
पृथ्वी वरचा माणूस
शेफारला होता
थाऱ्यावर त्याचा पाय कुठं होता?
धाव धाव धावत होता,
यंत्रालाही लाजवत होता, ।
घरदार, मुलंबाळं त्याच्या
जीवनाचा भाग होती,
पण पैशापायी नाती सारी
गौण होती ।
थांबणं त्याला माहीतच नव्हतं,
घरासाठी असणं रुचतच नव्हतं ।
थोडासाही वेळ त्याच्यासाठी
महाग होता,
निवांत पणाचा त्याला शाप होता ।
कधी कधी माणसातला बाप
हळवा होई,
निजलेल्या लेकराचा हळूच
पापा घेई ।
हे असेच होते वर्षानूवर्ष चाललेले,
कोणीच नव्हते पाहीले,
जग थांबलेले ।
पण एक दिवस असा आला,
एका क्षुद्र विषाणूचा
पृथ्वीवर फेरा आला ।
माणूस माणसाला
शिवेनासा झाला,
घरात मात्र लेकरांना बाप मिळाला,।
एका विषाणूच्या दहशतीने,
जग सारे हलले,
हळव्या आतल्या बापाला,
आता कुठे आपले घर कळले ।
पृथ्वी वरचा हा विषाणू
अचानक निघून जाईल,
प्रेमाचं आपलं माणूस मात्र
सोबत आपल्या राहील,
सोबत आपल्या राहील ।।
।। दिपाली दिलीप साळवी ।।
0 Comments: