तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)  भाग- १२

तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट) भाग- १२

तो आणि ती (प्रेम नावांची गोष्ट)

भाग- १२


माझ्या निराशेने आसमंत गाठला होता आणि तिला त्याला शोधण्याची, त्याला भेटण्याची अचानक ओढ लागली होती हे काय चालू आहे यांतच माझा गोंधळ उडाला होता. तो आणि ती आणि तिची ओढणी यांची एक नवीन कहाणी मला तिने सांगितली तिने एकदा त्याला आपली ओढणी दिली होती मग त्यानें तिला परत केलीच नाही जेव्हा ती सोबत नसायची तेंव्हा तिची ओढणी त्याच्यासोबत असायची मलाही दिसली होती ती ओढणी बऱ्याच वेळा त्याच्या गळ्यात पण कधी लक्षांत आलंच नाही. तो माझ्याकडे देवुन गेलेल्या सर्व वस्तु मी तिला दाखवल्या त्यांतील अनेक तिने लगेच ओळखल्या प्रत्येक वस्तु मागची एक वेगळी कहाणी होती ती मला सांगु लागली. ज्या माणसाला आपण हळवं समजतो ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाहीत, त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्तीच... वपुर्झाच्या या ओळी ती सार्थ ठरवतं होती. त्याला शोधण्याचा प्रवास आणि तिची होत असलेली नव्यानं ओळख माझ्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टींचा आणि आठवणींचा प्रवास होत चालला होता. मी त्याला काहीतरी विचारलं मलाच आठवत नाही काय विचारलं होतं ते ती म्हणाली. आम्ही दोघं सुरवातीला एकमेकांकडे पाहत देखील नव्हतो आणि तो काहीतरी वेगळाच असायचा त्याला शांत राहणे फारसे जमायचे नाही सतत काहीतरी करायचा तो पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काहीतरी लिहायचा काय माहीत नाही काय पण सतत आपल्या मोबाईल आणि वहीत काहीतरी करायचा. आमची ओळख झाली तेव्हापासून माझी रात्र त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय होत नसे. त्यांच्याशी बोलले की प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळायची त्याचं बोलणं चटकन कोणाच्या लक्षांत येतं नसे मात्र त्यांत विषयांची खोली आणि गांभिर्य असायचे. मला चांगलं आठवतंय मी सांगितलेली कोणतीच गोष्ट त्याने आजवर टाळली नाही. आपण 'आपण' नसणं यांच्यासारखी आपल्या दृष्टीनं दुसरी लज्जास्पद गोष्ट कोणतीही नाही. आपले स्वतःचे असे विचार असणं, आपल्या स्वतःच्या अशा भावना असणं आणि आपण त्या बोलून दाखवणं त्याच्यासारखं अभिमानास्पद आणि आनंददायी आपल्या दृष्टीनं दुसरं काही नाही. ह्या विख्यात मानससमाज शास्त्रज एरिक फ्रॉम यांच्या शब्दांना जगणारा तो मला तिच्या ती सांगत असलेल्या गोष्टीतुन सातत्याने दिसत होता. तिने सांगितलेला तो असाच होता रोखठोक आणि बिनधास्त आयुष्य जगणारा. मला अचानक एक फोन आला तुझ्या कहाणीत असलेला तो कदाचित मी पाहिला आहे. मी प्रचंड आनंदलो आणि थेट समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या जागी निघालो. गेल्या साधारण दिड एक वर्षांपासून न सांगता गायब झालेला तो आपल्या मागे प्रश्नांची सरबत्ती लावुन गेला होता. त्याला अनेक गोष्टींचा जाब विचारायचा होता तिचं किती प्रेम आहे त्याच्यावर हे त्याला सांगायचं होतं दोघांना एकत्र पाहुन मनसोक्त नाचायचं होतं कदाचित आता ते होणार या अपेक्षेने मी निघालो.

0 Comments: