जागतिक कन्यादिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
कविताः "कन्या"
धन्य झालो देवा, दिली एक कन्या।।
नाव तिचं 'संस्कृती' माझी सुकन्या।।धृ।।
दारिद्रय अन् अज्ञानाचा
अंधकार जडला होता,
लक्ष्मी अन् सरस्वतीचा
तिरस्कार होत होता.
धन्य झालो देवा, दिली एक कन्या।।
नाव तिचं 'संस्कृती' माझी सुकन्या।।१।।
साक्षात लक्ष्मीची पाऊले
पडली माझ्या दारी,
सरस्वती अन् महाकाली
आल्या माझ्या घरी.
धन्य झालो देवा, दिली एक कन्या।।
नाव तिचं 'संस्कृती' माझी सुकन्या।।२।।
मुलीशिवाय बाप असतो
मायेविणा भिकारी,
आई - बापाविणा बनते
कन्या भोगांची शिकारी.
धन्य झालो देवा, दिली एक कन्या।।
नाव तिचं 'संस्कृती' माझी सुकन्या।।३।।
शब्दांकनः
श्री.नवनाथ एकनाथ ठाकूर
( खिडकाळी -ठाणे )
9833584052




0 Comments: