तो आणि ती (भाग 5 )
तिचं रुपडं बघून चादंणही लाजवं त्यांचे अनेक फोटो रात्री काढलेले आढळतात. तिच्याकडून घेतलेला रुमाल त्यांच्या प्रत्येक फोटोत दिसून येतो. एक खंत मनात नेहमी राहील असे त्यानें एका विषयासंबंधी लिहून ठेवले होते आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण तिची काहीच माहिती आजवर दिली नाही ही गोष्ट त्याला आतून खात होती तुपाच्या लिखाणात यांचे संदर्भ आहेत. दोघ भांडण करत अगदी वैचारिक आणि मग एकमेकांना मनवण्यासाठी मोबाईलचा सहारा घेत. तो तर खूप हुशार होताच आणि तिही तशीच काहीतरी मला समजली होती दोघांच्या अनेक वयक्तिक प्रसंगाचे खूप आल्हाददायक वर्णन त्याने केले आहे. तिला पाहिले कि मला राग येतंच नाही काय माहित काय होतं आणि नेमकं अलीकडे तो आमच्यातही शांत शांतच राहत असे. त्यांनी एकत्र पहिला फोटो काढला होता त्याचे वर्णन त्याने केले आहे प्रवासाने बरेच थकून दोघ कुठंतरी बसले होते पायऱ्यावर आणि घामाघूम झालेले तो गाणे ऐकत बसलेला आणि त्यावेळी काढलेला तो फोटो अगदी लहान वाटत होते दोघं. एक गोष्ट मात्र खरी दोघांनीही फेसबुक व्हाट्सऍप या ठिकाणी दोघांचे एकत्र फोटो कधीच टाकलेले दिसतं नाहीत मात्र त्याने नकळत अनेक गोष्टी केलेल्या मला जाणवतात. तिची इच्छाशक्ती अतिशय भयानक अनेकवेळा तो केवळ ती सांगतेय म्हणून एखादं काम करत असे इतर त्याला त्यात काहीही रस नसे. सहवासातून त्यांचा स्वभाव एकसारखा झाला होता. धार्मिक गोष्टींचा पक्का विरोधक तो आणि त्याचा योग्य समतोल साधणारी ती मला जाणवली एखादी गोष्ट अगदी कोणाच्याही तोंडावर बोलणारा तो बऱ्याच बाबतीत अलीकडे शांत राहिलेला मी पाहिला होता हे त्याच्या आचरणात आलेले सकारात्मक बदल होते घराकडं पुरेसे दुर्लक्ष करणारा तो घरात लक्ष देतांना मी अलीकडे पाहिला. आपली प्रत्येक गोष्ट सर्वात प्रथम मला सांगणारा तो तिच्याबाबतीत मला काही बोेललाच नव्हाता हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. निर्धास्तपणे प्रसंगांना तोंड देणे ती त्याच्याकडून शिकली असावी. त्याच्या मोबाईल मध्ये तो जाण्यापूर्वी तिचा आलेला मेसेज होता अगदी सामान्य चर्चा होती तर्क फक्त शेवटी हेच म्हणाला आनंदी रहा. तिचा नंबर माझ्याकडे होता अगदी आजही वाटतं तिला विचारू सर्व काही रोखठोक मात्र त्याला दगा नाही देऊ शकत आणि मी नमतो. त्याच्या आणि माझ्या आठवणी अगदी भयानक आहेत गेल्या जवळ जवळ २० वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो शिक्षण वैगरे सर्व एकत्रच झाले माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला वाटे कि हे दोघ सख्खे भाऊ आहेत. अगदी अलीकडे २ वर्षांपूर्वी आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने वेगळे झालो होतो. माझी अगदी प्रत्येक गोष्ट त्याला माहित होती अगदी सर्वच आणि आता त्यानें त्याच्याबाबतीतले हे काम माझ्यावर सोपवले होते. आमची कहाणी रटाळ आणि मजेशीर नव्हती मात्र तो आणि ती अगदी रंजक असेच मला जाणवतात. तिच्या एक दोन मैत्रिणी त्याला माहित होत्या अगदी जवळच्या मला हे खूप उशिराने कळले. उगाच मेलेल्याला जागवण्याचे कठीण काम त्याने मला सोपवले होते पराभवाचीच चिन्हे समोर होती मात्र मला आशेचं किरण दिसलं आणि माझा वेगळा प्रवास सुरु झाला तिला शोधण्याचा. अगदी बारकाईने मी त्याचा गेल्या २ वर्षातील प्रवास अगदी ६ महिन्यात १० वेळा पाहिला अनुभवला आणि यातून मीचं कुठेतरी फसलोय असे मला जाणवू लागले हि कहाणी आपण नाव न घेता लिहितोय त्याचा काय फायदा त्याला होणार होता आणि तिची आणि माझी ओळख तशी पहावी तर नवीनच त्यामुळे मी हे सर्व त्याच्या बाबतींत लिहितोय हे तरी तिला काळात असावे का मला अनेक प्रश्नांनी घेरले होते. पणती जपून ठेवा अंधार फार झाला याप्रमाणेच मी माझे काम चालू ठेवले आणि एक दिवस तिचा मला मेसेज आला की तिला माझ्याकडे काही काम आहे आपण भेटू शकतो का मी होकार दर्शवला मला वाटलं हा उगवत्या सूर्याच्या किरणांचा इशारा होता कि आता काहीतरी नवीन घडणार.
तो आणि ती (भाग 5 )
संकलन- अविनाश पाटील





0 Comments: