कथा : गाठोडे

कथा : गाठोडे

कथा : गाठोडे (2 भाग २२ वा )

      ति तळमळली आकसाबोकशी रडू लागली स्वत:ला कोषू लागली नशिबाला दोष देत म्हणाली, या माणसाचा काही नेम नाही कधी काय बोलेल ते सांगता येत नाही.

भटू म्हणाला,आता हे काय नविन कशाला रडते काय झाले रडायला. तुम्ही बायका ना, नुसताच जिवाला घोर येथून तेथून सर्वच सारखे. थोडेसे काही झाले तर थोबाड वासतात आणी गाव भर त्यांचा धिगाना कुठेच जीवाला समाधान नाही आणी शांती नुसताच त्रास कुठल्या कर्माचे भोग मी भोगतोय काय माहीती. 

     मनू म्हणाली, मी कधी तुला त्रास दिला.तु माझ्याशी त्रयस्थ व्यक्ती सारखा वागतो तरी मी काही बोलत नाही. म्हणजे तुझी "योगी"तुला त्रास वगैरे देतेस की काय.

     भटू अडेबिडे घेत तोंड वाकडे करत मुदाम म्हणाला, छे, ती, तर तुझ्या पेक्षा सातपटीने चांगली आहे. खुप प्रेम करते माझ्यावर आणी मी ही.

     मनूने भटूचा गालगुचा घेत म्हणाली,आ रे वा ! वा रे वा !  ति म्हणे, माझ्या सोन्यावर खुप प्रेम करते.आणी मी काय तुला भोके पाडलीत की काय ? आला मोठा  तिचे कैतुक करायला ती आणलीस ना मला सवत माझ्या बोकाडी बसवायला !

     भटू थोडा गालातल्या गालात हसला तिच्याकडे हात वारे करत म्हणाला, तुझ्यामुळे घडले हे, काय गरज होती तुला मला लग्न कर म्हणून सांगायची आणि मी ही मुर्खाच्या नांदी लागून मुर्ख झालो. कशासाठी आलीस ते बोलायचे सोडून मागच्या उंची धुणी काढत बसते त्याने काय हसील होणार आहे तुला.

     मनू शांत झाली रघू पुढे वटवट करुन काय फायदा नाही आपण थेट मुद्यावरच येयायला हवे, जेणेकरून रघूशी शांतपणे मनातले बोलता तरी येईल म्हणत म्हणाली,भटू काय करायचे आपण ?

     भटू प्रति प्रशन करत म्हणाला, कसले, काय करायचे ?

     मनू शांतपणे म्हणाले,कसले काय म्हणतोस माझे मला नेतोस ना सोबत.

     भटू आचर्यने तिच्याकडे टक लावून बघत राहीला त्याचे मन भितीने कापू लागले तो स्तब्ध झाला त्याच्या मुखातला शब्द गायब झाला होता नुसते आवासून कितेक क्षण तसाच होता आता निदान तिला ठेवणे नठेवणे हे तरी सांगायचे होते पण त्याच्या डोळ्यांतले तेज जणू गायब झाले चेह-यावरचे भाव नस्ट झालेल्या सारखे दिसू लागले.तो तिचे शब्द ऐकून खिन्न झाला होता काय बोलावे ते कळत नव्हते. त्याला पुन्हा पुन्हा तोच आवाज त्याच्या कानात घुमत राहिला. तो केव्हाशी स्वत:ला सावरत म्हणाला, मनू हे कसे शक्य आहे. तुला आताच सांगतो मी तुला माझ्या सोबत नेणार नाही. मनूचा नुसताच जिवाचा खुर्दा झाला ती सुन्न झाली ती जी आशा घेऊन आली होती ती सुध्दा मावळताना दिसत होती. मनूला माहीती होते भटू असेच काहीतरी म्हणेण आणि तिला वाटेला लावेल पण ति आज तयारी निक्षी आली होती रघू कडून काही करुन त्याच्या मनातल्या गाभाऱ्यातल्या गोष्टी काढून घ्यायच्या होत्या .भटू तिच्या मनाची अवस्था बघू लागला हि काय गोंधळ घालते ते बघण्याच्या तयारीत होता.

     मनू म्हणाली, भटू नको ना असे बोलू तुच असे म्हणाला तर मी कुणाकडे बघू मला तुझ्या शिवाय कुणाचा आधार आहे काय करु मी कुठे जावू मी ति रडत होती भटूकडे सोबत घेऊन जाण्यासाठी याचना करत होती.मात्र भटू तसाच काहीना बोलता उभा राहिला ती रडते आहे याचना करणे आहे. पण आता भटूचा पान्हा आटला होता पुन्हा एकदा सोबत घेऊन जाण्यासाठी तो तयार होईना.जणू त्याच्या मनातल्या गाभाऱ्यातल्या जखमेची तिने त्याला नाकारल्याणी ओल  शिल्लक होती .

     भटू म्हणाला, पुरे उगाच कशाला रडते आणि फुकट तुझे मोत्या सारखे अश्रुंची उधळन करते तु कितीही रडली कुडली तरी मी तुला माझ्या सोबत नेणार नाही समजलीस. 

     मनू रडल्या सुरातच म्हणाली भटू नको ना असे बोलू मला जाम भिती वाटते रे तुझ्या सोबत राह्याची तुझ्या सोबत संसार करायची मी नेहमी मनात खूनगाठ मांडत आली आहे. आणि तु परक्या माणसालाही असे लोक तोडून बोलत नाहीत तु तसा मला धुतकारतो आहे. मी चूकले म्हणून काय येवढी मोठी सजा. नाही मी मुळीच आता तुला सोडून राहणार नाही. तिचे डोळे पाणावले ती थरथरत्या हातांनी त्याचा हात हातात घेत म्हणाली,भटू तुला माझी शपथ आहे नको ना असे वागू.

     ति रडत असल्याने भटू थोडा बिथरला गोधळला होता त्याच्या अंगी असलेल्या दया करुणा ममतेने तो शांत पणे तिचा हात घट्ट आपल्या हातात पकडून घेत म्हणाला,तुच सांग मी काय करु त्याचे डोळे पाणावले तो थरथरत्या हाताने तिचे डोळ्यात आलेल्या गालावरचे अश्रू आपल्या हाताने साप करत राहिला ती तशी त्याच्या हात घटृट पकडत मोठ्याने हुंकार देत आवळा गिळीत म्हणाली, भटू बोलना मला नेशील ना तुझ्या सोबत.

     भटू तसा मनातल्या गाभाऱ्यातल्या जखमेची ओल शिल्लक ठेवत म्हणाला, मनू आयुष्यात जे आपण करतो ते नित्तेनियम चांगले केले तर समाज मनावर कोरले जाते आणि त्यावरुन माणसांच्या कर्माची पोच पावती असते आणी मी तर आता लग्न केले आहे मी कसे तुला सोबत घेऊन जावू शकतो.  

     सरीताबाई घरात उठबस करत होत्या केव्हाची मुलगी भटूला भेटायला गेली आहे तिचा आजू पत्ता नव्हता.भटू भेटला की,नाही दोघांची भेट झाली की,नाही ? भटू तिच्या गोष्टींचा स्विकार करेल का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.तेवढ्यात त्यांची सुनबाई सरीताबाई जवळ आली त्यांना म्हणाली,आई ताई केव्हाच्या गेल्या आहेत त्यांची भेट झाली असेल ना अजून परत आल्या नाहीत. कुठे जास्त दुर वगैरे नाहीत ना गेले.सरीता बाई आतल्या आत कुढत राहील्या आपल्या सुनेला म्हणाल्या, येवढ्यात तर येयायला हवे होते. पण का उशीर झाला ते कळत नाही. या पोरीने नुसता गोंधळ करुन ठेवला आहे. त्यामुळे माझ्या मनाला घोर लागला आहे.कसे होईल या पोरीच काय सांगता येत नाही.सुनबाई जरा फोन लावून बघा. कुठे आहेत ते तरी समजेल आपल्याला.

     सुनबाई ने फोन केला आणि रिंग वाजली ती धुंदीत होती भटूच्या नकाराने ती खसली होती ति तर भटू कसा मान्य करेल त्यात गुंतली होती. फोन उचला जात नव्हता म्हणून सुनबाई ने आपल्या सासूबाईला म्हणाल्या,आई फोन ताई उचलत नाहीत. 

     सरीताबाई सुनेचे सात्वन करत म्हणाल्या,असू दे ,ती भटू सोबत असेल म्हणून फोन उचलत नसेल.

     मनू शांतपणे म्हणाली, आम्ही दोघी जणी नाही राहू शकत एकत्र ?

     भटू म्हणाला, नाही मनू, तसे होऊच शकत नाही म्हणून तर मी तुला माझ्या सोबत घेवून जावू शकत नाही.

     तुला काय आणी कसे सांगू योगीला हे मान्य नसेल मी तिला ओळखतो तिच्या सहवासात राहतोय.मला माहीती आहे जे शके नाही ते करु नये,आग आहे त्यात हात घातलाय तर जळेल हे माहीती असताना उगाच कशाला दुसास करायचे

     मनूने भटूला प्रश्न करत म्हणाली, रघू एकदा तर तिला कल्पना दे ? 

     भटू म्हणाला, नाही ग. टिनू मी हे ही करु शकत नाही. ज्या बाईला माझ्या बाजूला दुस-या स्त्रीची सावली देखील चालतं नाही ती स्त्री आपल्या नव-याची दुसरी बायको सहन करेल का हे समज.

     मनू म्हणाली, ही तर चांगली बाब आहे. माझ्यासाठी आणी तुझ्यासाठी ही, ति तुला सोडून जाई आणी आपण दोघे राहू.

     भटूने तिचे असे स्वार्थी शब्द ऐकून म्हणाला, हे काय म्हणते, तुला कळते का ? कुणाला घालवायला बघते ती माझी बायको आहे आणी मी तिच्यावर खुप प्रेम करतो मी तिच्या शिवाय राहू शकत नाही .

     मनू म्हणाली भटू मी ही तूझीच बायको आहे .

     भटू म्हणाला,तो अधिकार गमवला आहे.आणी मी योगीला या जन्मातच काय तुझ्या धर्मा नुसार सात जन्म म्हणतात ना त्यात ते ही आपुरे पडतील. समजलीस तुच एक काम कर ना तु आता दुसरे लग्न करुन घे बघू.

     मनू म्हणाली,भटू ते ही शके नाही.तु तुझ्या बायकोला सोडायला तयार नाही मग मी कसा माझा नवरा असून दुसरे लग्न करणार भटू तुला काही वाटते का कुठला माणूस असेल आपल्याच बायकोला तु दुसरे लग्न करुन घे म्हणुन भटू मी हिन्दु स्त्रि आहे आणी हिन्दु स्त्रि एकवेळा ज्या माणसाशी विवाहाबध होते ति पर पुरुषाचा विचार ही मनात आणन नाही ज्याशी विवाह करते त्याच्याशीच एकनिष्ठ राहते.त्यालाच आपला पती परमेश्र्वर मानते तो कसाही असो तो दारुडा असला का की,तो रोज मारझोड करणारा असला तरी तोच तिचा सात जन्माचा जोडीदार असतो परमेश्र्वर तो मेला तरी त्याच्यासाठी सती जात होती.मग मी का माघार घेवू सांग मला.  

     भटू आता कुठे मी आझाद झाली होते वडीलाच्या नजरे तून.ते गेले. मी,किती आनंदीत झाले होते.ते मलाच माहीती पण तु माझ्या आनंदावर विरजण घातले नशिबच माझे पुटके तर दोष कुणाला देणार.मीच खरोखर चुकली याची जाणीव मला झाली आहे.आता तुलाही मी नकोशी झाली आहे.आता मी काय करु तु एकच माझा साहरा होता पण तो ही तु नाकारला काय करु मी ती रडत होती. तिचे डोळे पाणावले होते. ती बोलताना थरथर कापू लागली तिचा जिव कासाविस झाला ति भटूकडे बघत म्हणाली,मी ना सर्वांना नको झाली आहे. तुलाही नको झाली आहे.तर माझा जगून तरी काय उपयोग नुसते धरतीला बोज.रडत रडत ति भटूच्या निरोप घेत म्हणाली,तु आनंदात राहा तु तिच्यावर खुप प्रेम कर मी आता कधीच तुझ्या जिवनात येणार नाही तुझ्याच काय मी कुणाच्याच जिवनात दखल देणार नाही. ति तळमळली आकसाबोकशी रडत रघूच्या पायाला हात लावत म्हणाले.माफ कर मला माझ्या कडून काही चूकले असेल तर परत तुझ्या आयुष्यात मी येणार नाही .तिने आपल्या पतीचे शेवटचे दर्शन घेऊन पुढे चालू लागली.तेवढ्यात आता रघू म्हणाला थांब मी तुला घरी सोडतो.पण तिने भटूला नकार दिला.भटू म्हणाला नाही मी सोडतो तुला.ति रडतच नाही मी कोन तुझी तर तु मला घरी सोडणार कुठल्या नात्याने.भटू तिचा जवळ जात तिच्या ओघळणारे अश्रू आपल्या हाताने साप करत म्हणाला,तुझ्या  नव-याच्या नात्याने ति त्याच्याकडे बघतच राहीली.तिला नवल वाटले काय ? नाही तु माझा नवरा राहीलाच कुठे तुच म्हणाला ना मघाशी.

     रघू म्हणाला,हो,मी म्हणालो खरा पण तेव्हा माझ्या बायकोच्या मनात वेगळेच विचार होते.पण ती आता मनात वेगळेच विचार आखून चालली आहे. ती घरी नाही पोचली तर मलाच जबाब द्यावे लागतील ना.

     मनू फुदत फुदत रडत म्हणाली,बायकोची इतकीच काळजी राहीली असती तर काहीतरी मार्ग काढला असता ना.असे अर्ध्यावाटेवर सोडले नसते. 

     भटूने तिचा इरादा ओळखला होता ईचे खरेच खरे नाही जावू कुठे तरी जीव द्यावा आणि माझे नाव यावे भटूनचे हे कृत्य केले असणार असे नाहाक आरोप लावले जातील ती जीवनाशी जाईल तर जाईल माझे माझे ही नुकसान करुन जाईल तिला कसेतरी शांत केले होते.तो तिच्यात चांगला रमला म्हणून तिच्या मनावरचा तिचा तान कमी झाला होता त्याच्याकडे बघतच ती म्हणाली,आता आपण कुठे जायचे तुझ्या घरी ना .भटू गरबडीत म्हणाला, नाही हो,माझ्या घरी नाही मी तुला भांडुपला सोडतो. ति त्याच्याकडे बघत राहीली.

     भटू तिला विश्र्वासात घेत तिचे गालाचे चुंबन घेतले म्हणाला, मनू तु नको त्रास करुन घेवू मी तुला अंतर देणार नाही. तु माझ्यावर विश्वास ठेव आपण काही तरी मार्ग काढू भटूच्या अशा बोलण्याने तिला थोडा धीर आला.आणी म्हणाली, भटू खरच ! तु काहीतरी मार्ग काढणार भटूने नुसती होकार आर्थी मान हलवून होकार दिला.तिचे मन आता त्याच्या अशा बोलण्याने समाधानी शांत झाले होते. काहीतरी मार्ग काढला तर मला नेहमी भटूच्या जवळ राह्याला भेटेल मनातल्या मनात समाधान मानत दोघे चालू लागले होते. पण भटूच्या मनात असंख्ये प्रश्न पिगा घालत होते. आता पुरते मी सांभाळून घेतले. नंतर मनूने जिवाचे बरे वाईट केले तर मलाच माघात पडेल याची जाणीव त्याला झाली होती मात्र आज त्याच्या धुर्थपणामुळे पुढे होणारे अनर्थ टाळता आले होते. ते पुढे येताच त्यांनी रिक्षा घेतली जोवर टिनूचे घर येत नाही तोवर ती भटूला घट्ट घट्ट पकडून बसली होती. तो ही गुपगुमान तिला आपल्या कुशीत घेऊन बसला होता. मनूचा डोळा कधी लागला समजलेच नाही.

     रिक्षा नाडकर्णी निवासा जवळ येवून पोचली भटू मनूला उठवत म्हणाला,चल उठ घर आले. सरीता बाईचे मन मनू बाहेर गेल्यापासून रत्यावर लागले होते. त्यांनी रिक्षा बघताच सरिताबाईच्या जीवात जीव आला होता. त्या पटकन रिक्षा जवळ आल्या आणी भटूला म्हणाल्या, 'भटू बरा आहेस ना , त्यांनी लगेच मनूचा हात धरला आणी येवढा उशिर केला येयायला म्हणत भटूला घरात येण्यास सांगितले भटूने रिक्षाचे पैसे देत दोघीच्या माघे आला.  

     भटू नाडकर्णी निवासातून बाहेर निघाला होता मनावर मोठे दडपण घेवून पुढे काय घडेल याची कल्पनांचा विचार करत तेवढ्यात त्याच्या मनात योगीची आठवण आली आणी घराकडे पोचण्यासाठी घाईघाईने निघाला.

                                      भटू हरचंद जगदेव जापीकर  7057586632

0 Comments: