कविता : मनातले पानावर
होय तुच माझा शिल्पकार .तुच जीवनाचा प्रवासी.
तुझ्यातच सारे काही आलबेल दडलय.
माझ्या मनातले भाव शब्द तुझ्यातच व्यक्त करते.
कसे सांगु तुझे वलयांकित नाते भावनांना
जुळवणारा मनाचा कोपरा रिक्त करणारा. तुच ना!
काही नाती कोरडा ओलावा आसतो.
पण तु मात्र जीवनाची दिशा दाखवणारा.
तुझ्याच ह्रदयाचा प्रेरणेतून जग चालते.
तर कुणाचे आयुष्य घडत.
काही तुझ्यात आपले प्रतिबिंब उमटवतात.
तुच रस बिंदु होय. नाही विसरणार मी तुला.
तुझ्या प्रेमाच्या आधाराने मी लिखाण करू लागले.
आभारी आहे मी तुझी.
मनातले दुःख तुझ्यातच व्यक्त करतो.
चल ठेवते मी आता मर्यादा आहेत. तुझीच सखी.
प्रतिभा केदार पवार




0 Comments: