स्वप्नातील शाळा 

      नमस्कार सज्जनहो ,

       सगळ्यांपेक्षा काही आगळेवेगळे व समाजहिताचे करावे असे आपणास वाटते हा आपणातील चांगुलपणा समाजाच्या लक्षात आला नाही हे समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

     चांगल्याला नेहमीच विरोध झाला.छत्रपती शिवराय हे हि यातून सुटले नाहीत. परंतु त्यांची समाजासाठी ( समाज म्हणजे एक जात किंवा धर्म नव्हे,तर अखंड मानवता ) काही करण्याची इच्छाशक्ती संपली नाही तर त्या विरोधाने अधिक बळकट झाली.

     गावातील शाळेत आमुलाग्र बदल घडवून गावाचे व शाळेचे नाव अखंड महाराष्ट्रात करण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वाला नेणे आहे.आपले विचारच मुळात वेड्यांचे आहेत,पण वेडेच ( झपाटलेले ) लोक इतिहास घडवतात हे विसरुन चालणार नाही.

     एकाला एकाची साथ लाभली तर खूप काही नवीन होऊ शकते.आपले स्वप्न साकार व्हावे,समाजाने इतरांना प्रेरणादायी असे काही करावे असे एक शिक्षक म्हणून मला हि वाटते.आपण मिळून समाजासाठी नक्किच काही आगळेवेगळे करु शकतो.आर्थिक सहकार्य आपले व वैचारिक संकल्पना आपली असे मिळून हे होऊ शकते.

     ज्या गावात शैक्षणिक बदल घडवून आणायचा आहे तेथे मी विना अनुदानावर काम करण्यास तयार आहे.काम करताना मी माझा स्वार्थ बघतो आहे असे आपल्या लक्षात आल्यास सदर कृत्याबाबत आपण ( समाज ) जी शिक्षा द्याल ती मी भोगण्यास तयार असेल. शर्त तेथे राजकारण नसावे.

      महाराष्ट्रात दर्जेदार जिल्हा परिषदेच्या शाळा उभारणीत निस्वार्थ सेवा करण्याची तळमळ राखणारा प्राथमिक शिक्षक.

   श्री.प्रशांत महादेव भोसले

          ९००४८९४८५५

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

0 Comments: