कथा : गाठोडे  (मनू भटूला बघून आनंदीत झाली)

कथा : गाठोडे (मनू भटूला बघून आनंदीत झाली)

कथा :  गाठोडे  (भाग २१ वा) 

         मनू भटूला बघून आनंदीत झाली मन कुठे तिचे आता शांत झाले होते.ति भटूचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, भटू आपण इथे न बसता बाहेर कुठे तरी जावू या का ? भटूने नुसते हुम्म केले आणी दोघे चालत चालत भांडुप रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडले.

         भटू तसा मनातल्या मनात घुमसत होता काय करावे, आणी कसे वागावे ते त्याला समजत नव्हते.घरातून निघतांना त्याने आपल्या बायकोला खोटे कारण सांगून निघाला होता ते ही त्याच्या मनाला खात होते.म्हणून तो आतुन पक्का खिन्न झाला होता पण वरकर्णी तो मी आनंदी आहो असे भासवत होता.तो मनातल्या मनात हसत म्हणाला,असे किती दिवस चालायचे भटू ! तूझे आता लग्न झालय तुला असे वागणे सोबत नाही. तु तुझे वागणे बदलले नाहीतर मोठा फटका बसणार स्वता:ला सावर भटू !

         भटू आज कसा नकळत मनूचे बरोबर तिच्या हातात हात घेऊन चालत होता पण मनात असंख्य प्रश्न त्यातून मनात होणारी चिडचिड त्यातून होणा-या असंख्य वेदना होऊन पण तो मनूच्या आग्रह पोटी तिच्या सांगितल्या नुसास आपल्या मना विरोध भटूला पटत नसतांना तरी त्याने ती वाट धरली होती त्याच्या मनाला जाणीव झाली आपण असे करायला नको असे ही त्यांचे मन त्याला म्हणत होते. 

         भटू चालता चालता मनूला म्हणाला,"आयुष्य म्हणजे फक्त टाईमपास नाही, आयुष्य म्हणजे जीवंन आहे आणि ते समजून उमजून घ्यावे लागते आणि तू ते समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीस. तुला कसे समजवू तसे तर म्हणा तु समजण्या पलिकडे गेली आहेस.

         भटूचे असे बोलने ऐकून तिचा चेहरा हिरमुसला होऊन ति केवीलवाणी म्हणाली, भटू काय बोलतोस तू तुला कळतेय का ?

         भटू म्हणाला,हो, मला काहीच कळत नाही मी, मी बिन अक्कली आहे.अक्कल फक्त तूलाच !

         मनूने भटूचे असे स्वार्थी बोलने ऐकून थोडे नमतेपणे घेतले आणी म्हणाली,भटू असे नकोना चिडू, थोडा शांत हो बघू,माझा तुला दुःखवायचे हेतू नव्हता रे ! जरा समजून घे, ना.तुला काय वाटते तुझाच चिडचिडेपणा होतो मी काही माणूस नाही माझे ही होते चिडचिडपण मन ही अस्वस्थ होते. मी कुणाला सांगू तुझ्याशिवाय माझे आहेच कोन.

         भटूचा पारा जरा खाली आला थोडा शांत होत म्हणाला,मनू तू वागतेच ग तशी ? तू आलीस कशासाठी ते राहीले आणी वेगळेच डिवसते तू समजत कशी नाही मी बायकोला तुझ्यासाठी खोटे कारण सांगून आलोय.

         मनू भटूकडे बघत म्हणाले,'मी नाही का तुझी बायको !

         भटू म्हणाला, हो,हो,बाबा तु होतीस बायको !

         मनू पटकन म्हणाली, होतीस नाही, आहे मी बायको, तूझी !

         भटू म्हणाला, हो, मनू मी नाही विसरलो,तू ही माझी बायको आहे. पण तु बायको सारखी नाहीस वागलीस  बायको सारखी वागली असती तर आपल्याला हे दिवस बघायला लागले नसते.येवढ्या यातना भोगल्या नसत्या आपण, तुझ्यासाठी नुसतेच झुरुन दिवस काढले मी,पण तुझ्या मनाला पाहाना फुटलाच नाही. किती तरी वर्ष तुझ्या येण्याची वेळ्या सारखी वाट पाहत होतो तुला कितेक वेळा घेण्यासाठी आलो पण नाही तु तुझ्या बापाला घाबरत राहीली तुझ्या येण्याने तुझ्या बापाचे तोड काळे होईल,तेव्हा तू माझ्या सोबत लग्न करायला नको होते. मी तर माझ्या जातीची तुला आठवण करून दिली होती. तुच म्हणाली, होतीस ना की, मला तुझ्या जातीशी काहीही घेणे देणे नाही. म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केले.

         मनू म्हणाली होय, भटू तू मला तुझ्या जातीची वेळो वेळी आठवण करून देत होता मी नाकारत नाही मी मान्य करते.पण तुझे ऐकले नाही हे ही खरे आहे त्याचे खरे कारण माहीती होते तुला बाबांनी मला आन घातली होती त्यांचे तोंड काळे होईल असे मी वागवू नये,पण मी तुझ्या सोबत लग्न करुन ते केलेच होते ना, त्यांना समाजात तोड काढायला जागा मी ठेवले नाही.हे कुणाकरीता केले मी तुझ्यावर अपार प्रेम करत होते. हे तुझ्यासाठी ना,बघ भटू एकमेकांच्या उण्या धुण्या काढत बसण्यात काहीच हसील होणार नाही.

         हो, मनू म्हणून तर मी म्हणतोय आता तुझे माझे करुन काय फायदा तूझ्या सांगण्यावरुन मी लग्न करुन घेतले मी स्वत:हुन लग्न केले का ? नाही तुझ्याच म्हणण्या नुसार घडले ना मी तरी म्हणत होतो टिनू मी थांबायला तयार आहे ग पण नाही तु काहीही कर पण लग्न करून घे, काय मी खरोखर तुझ्यासाठी थांबलो नसतो का ? भटूच्या डोळ्यात अश्रू भरुन आले होते तो तळमळत होता. मनू त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याला करुवाडत होती. तो म्हणाला , मनू काय कारण होते ते जेणेकरून मी तुझ्या पासून दूर व्हावे.

         मनू आपले अश्रु पुसत म्हाणाली, भटू तु माझ्यापासून दुर व्हावे म्हणून मी नाही केले. मी केले होते फक्त तुझ्या आनंदासाठी तु नेहमी नेहमी येवढ्या लाम जम्मुला माझ्या करता येते होता आणी मी नेहमी तुझ्यावर अन्याय करत होते बाप मरण्याचे कारण सांगून तुला दुर ठेवले.तुझे हाल माझ्याकडून बघीतले जात नव्हते.मला माहीती होते माझे बाबा येवढ्या लवकर मरणार नाहीत आणी मी तोवर तुझ्याकडे येवू शकत नाही आणी आशा आवस्थेत जर तुझ्यावर मी खरे प्रेम करते आणी तोच असा दु:खीकष्टी याच्याने मलाच यातना होत होत्या मीच तुला या अशा अवस्थे पर्यंत आणून सोडले मग तुझ्या आनंदासाठी मी सारे केले ना.

         भटू म्हणाला, माझ्या आनंदासाठी,का तुझ्या बापाच्या ईज्जतीसाठी ?

         मनू म्हणाली,भटू हे काय, माझ्या बापाची ईज्जत तर तेव्हाच गेली मी तुझ्या सोबत विवाह केला तेव्हा त्यांनी तर आपल्या लग्नानंतर स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. कितेक दिवस ते घरातच्या बाहेर निघाले नाही.त्यांनी तर एक धस्का घेतला होता मला तर असे वाटायला लागते होते आता बाबा काही राहातं नाहीत. पण तूझ्याकडून ईकडे आले तेव्हा त्यांना बरे वाटले बऱ्याच वेळा त्यांनी मला बाहेर कुठेच जावू दिले नाही नेहमी माझ्या सोबत राहून माझ्यावर त्यांचे बारीक लक्ष्य राहातं असे पण मी त्यांना म्हणाली, होती बाबा तुम्ही निच्छित राहा तुम्ही गेल्याशिवाय मी भटूकडे जाणार नाही विश्र्वास ठेवा माझ्यावर तुम्ही जसे जिद्दी आहेत तसेच मी ही जिद्दी आहे आखीर मी तुमची मुलगी आहे.

         भटू हरचंद जगदेव जापीकर....

         7057586632

0 Comments: