कविता : आज ही आई निवांत झोपली आहे

कविता : आज ही आई निवांत झोपली आहे

 आज ही आई निवांत झोपली आहे

          

ऐकू येत नसे तिला, तरी माझा आवाज ऐकला की

झोपेतून खड करून जागी व्हायची,

आणि मला म्हणायची,

आला का तु घरी! आत्ता नाही  उठत मी!

आणि काही बोलत पण नाही!

असे ठाम कडक बोलणारी माझी अाई,

आज पाच वर्ष  झाली आई निवांत झोपली आहे......


जात आसे मि कधी मुंबई ला, नेहमी मला टोकत असे,

सांभाळून जा ह! सांभाळून रहा,आसे म्हणत आईचे ,

डोळे पाण्याने भरुन यायचे, मी मुंबईला जाण्याचा,

आनंद तर तिला व्हायचाच, पण मनात खंत ही,

तेवढीच वाटायची,

ती माझी फार काळजी करायची ,

असे सारख माया, प्रेम करणारी आई ,,

आज पाच वर्ष  झाली आई निवांत झोपली आहे......


मी जर का आलो कधी गावाला ,

इडा पिडा जाओ माझा लेक सुखी राहो

असे म्हणत भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायची,

माझ्या सोबत गप्पा मारत बसायची ,

तासन तास बोलनारी माझी आई ,

न सांगता कायमाची निघुन गेली.

आज पाच वर्ष  झाली आई निवांत झोपली आहे......


आज ही आईची जागा रिकामीच आहे,

घरात आज पण तिचा भास होतो,

अस वाटतय बोलणारच आई माझ्या सोबत आत्ता,

पण आज माझी कोकीळा शांत झोपली आहे.

तिच्या आठवणीने मन गहिवरून यत,

तिच्या सोबत बोलण्यासाठी जीव तळमळतोय,

पण मला सोडून ती कायमची निघुन गेली.

आज पाच वर्ष  झाली आई निवांत झोपली आहे...

आई निवांत झोपली आहे...


आज दिनांक ०५, सप्टेंबर,२०२० शिक्षक दिवस

प्रत्येक व्यक्तीचा पहिला गुरू म्हणजे आई..  

आणि या पवित्र दिवशी माझी आई, माय, माझा गुरु आज पांच वर्षे पूर्ण झाली, ती मला कायमची  सोडुन गेली,,,,,,

तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना.......!!


                        शाम परशुराम बैसाणे

0 Comments: