कविता - फार झाले..आता बस्स..

कविता - फार झाले..आता बस्स..


फार झाले...आता बस्स...

जातिजातीत दंगली भडकवणारे,भडवे मोक्कार झाले
सफेद कापड्यातील पुढारी मात्र,मुद्दाम चुक्कार झाले


रस्त्यारस्त्यात बहिणींना छेडणारे ,भरपूर टूक्कार झाले
वकिलांनी बेईमाणीने सोडवुन आणलेले,चोर फरार झाले


विधवा आणि परीत्यकतेचे,बरेच सहेतुक आधार झाले
घरकुल लाटण्यास अनेक श्रीमंत, गरीब अन नादार झाले


व्याजात रक्त पिणारे रक्तपिपासू,सावकार भरपूर झाले
शेतकऱ्यांची शेती-घर लाटणारे, जमीनदार फार झाले

काळा पैसा कमविणारे,स्विस बँकेचे खूप खातेदार झाले
एका कॉरटर साठी मत विकणारे, खूप मतदार झाले

वर्षानुवर्षे आम्हा लुटणारे ते नेते,गब्बर फार झाले
गरीबांची लाच घेणारे कर्मचारी,निब्बर फार झाले

गळ्यात माळ असून खोटं बोलणारे, वारकरी हुशार झाले
सुपारी घेऊन माणसासही मारणारे, धारकरी क्रूर फार झाले

सत्य सांगणाऱ्या साक्षीदाराचे सतत, पुकार फार झाले
मायबापाला सांभाळण्यासाठी मुलांचे, नकार फार झाले


ओठावर ओठ टेकवणारेच कवी,मोक्कार झाले
स्वतः वागूया आपण चांगले,धिक्कार फार झाले


फार झाले..आता बस्स................
 पहायचे आहे, हे सर्वच थांबताना
सर्वांनाच आनंद वाटेल,समानतेच्या वाटा तुडवतांना


मनोहर बसवंते-गुंज ता वसमत ह मु नांदेड

(8830322659)

2 comments