कविता : मनातले पानावर
आसवांची फुले देऊन
चंदनापरी झिजवुन स्वतःला
ज्ञानाचे आमृत पाजुन आम्हाला
सज्ञान बनविले आपल्या लेकराला।
तुमच्या विश्वकोशित ज्ञानाचा
संग्रहित पुजीतो आम्ही
पण आजुनही थोडे
परिपुर्ण ज्ञानी नाही आम्ही।
पण एकच खंत मनी बोचती
आचरणात भ्याकड आम्ही
सागरा परी उसळुन लाटा
त्या चैत्त भुमीवरती
हेच प्रेम आम्ही वाहतो
तुमच्या चरणावरती
जन्मो जन्मी तुमची पोकळी
भासे आमच्या आंतरयामी
देऊन जन्म आम्हा नव्याने
बोधी वृक्षाखाली
(मातृपितृ ते संविधान दाता उपकार आम्हा वरती)




0 Comments: